फोन टिकला पण ब्लॅक बॉक्स खराब झाला! एजन्सीचं हे स्टेटमेंट हास्यास्पद – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फोन टिकला पण ब्लॅक बॉक्स खराब झाला असे तपास यंत्रणेने केलेले विधान डाऊटफुल आणि हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पवार यांनी डीजीसीए (नागरिक उड्डाण महासंचालनालय) च्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली आहे. परदेशातून आणलेल्या जुन्या Learjet विमानाची नोंदणी भारतीय नियमांचे उल्लंघन करून झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. नियमांनुसार दोन तासांचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आवश्यक असताना, या विमानात केवळ 30 मिनिटांचा CVR होता. असे असतानाही त्याची नोंदणी झाली असल्यास, यात डीजीसीएच्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग असू शकतो, असे रोहित पवारांनी नमूद केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *