आंतरराष्ट्रीय न्यायालयाची कोणाला भीती वाटते?कदाचित कोणालाच नाही. जगातील या सर्वोच्चन्यायालयाकडे स्वतःचे कोणतेही पोलिस दल नाही. तसेचसरकारांना आपल्या निर्णयांचे पालन करण्यास भागपाडणारी कोणतीही यंत्रणाही नाही. असे असूनही त्याच्यानिर्णयांचे नैतिक महत्त्व खूप मोठे आहे. हे न्यायालयराष्ट्रांनी केलेले गुन्हे जगासमोर आणते आणि त्याचासंबंधित देशांच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. याच कारणामुळे गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीयन्यायालयाने (आयसीजे) दिलेल्या एका निर्णयाने काहीदेश अस्वस्थ झाले आहेत. या निर्णयात म्यानमारलारोहिंग्या समुदायाविरुद्धच्या नरसंहारासाठी जबाबदारधरण्यात आले आहे. म्यानमारने हा निर्णय फेटाळूनलावला. चीनने न्यायालयाच्या दृष्टिकोनावर चिंता व्यक्तकेली. भारताने या निर्णयाचे स्पष्ट स्वागत करणे टाळले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, ते या निर्णयाचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर आयसीजेचे ‘राजकीयीकरण’ टाळण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिलाआहे, परंतु हा निर्णय अमेरिकी सरकारच्या स्वतःच्यापूर्वीच्या आकलनापेक्षा वेगळा नाही. मार्च 2022 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी औपचारिक घोषणा केली होती की, म्यानमारने रोहिंग्यांविरुद्ध नरसंहार केला आहे, या निष्कर्षापर्यंत अमेरिका पोहोचली आहे. मग ही कचरण्याची वृत्ती का? याचे एक संभाव्य कारणअसे असू शकते की, आयसीजेसमोर प्रलंबित असलेल्यानरसंहाराच्या इतर प्रकरणांवर या निर्णयाचा व्यापकपरिणाम होईल, अशी अमेरिकेला चिंता आहे. यामध्येसर्वात प्रमुख प्रकरण गाझामधील इस्रायलच्याकारवाईविरोधात दक्षिण आफ्रिकेने दाखल केलेल्याखटल्याचे आहे. म्यानमारचा हा निर्णय इतरप्रकरणांमधील युक्तिवाद आणि पुराव्यांच्या मूल्यांकनाचीचौकट मजबूत करू शकतो; मात्र त्यामुळे त्या खटल्यांचानिकाल निश्चित होणार नाही. चीनचे म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाशी घनिष्ठ संबंधराहिले आहेत. म्यानमारच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप नकरण्याच्या धोरणावर चीन सातत्याने भर देत आला आहे,परंतु शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांवरील गंभीरमानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांमुळे चीनलाहीआंतरराष्ट्रीय चौकशीला सामोरे जावे लागत आहे. अर्थात,अशी प्रकरणे आयसीजेसमोर आणता येतील की नाही, हेन्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि संबंधित कायदेशीरअटींवर अवलंबून असेल. म्यानमारने 2017 मध्ये उत्तर रखाइनमध्ये रोहिंग्यांविरुद्धनरसंहार केला होता, हा आयसीजेचा गेल्याआठवड्यातील निर्णय तात्कालिक राजकीयप्रतिक्रियांइतकाच मर्यादित नाही, तर त्याचे महत्त्व अधिकआहे. न्यायालयाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे,जेव्हा त्याने कोणत्याही देशाला थेट नरसंहारासाठीजबाबदार धरले आहे. जगात नरसंहाराच्या घटना कमी झाल्या आहेत, म्हणूनअसे घडलेले नाही. होलोकॉस्ट, रवांडा, स्रेब्रेनिका आणिकंबोडिया ही याची काही अत्यंत भयावह उदाहरणे आहेत.उलट, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार एखाद्या देशालानरसंहारासाठी जबाबदार धरणे ही अत्यंत कठीण प्रक्रियाआहे, हे यामागचे खरे कारण आहे. नरसंहारासंबंधीच्याकरारानुसार केवळ प्रतिबंधित कृत्यांचे-जसे की हत्याकरणे किंवा गंभीर शारीरिक-मानसिक इजापोहोचवणे-पुरावे देणे पुरेसे नसते. कोणत्याही राष्ट्रीय,जातीय, वांशिक किंवा धार्मिक समूहाला पूर्णपणे किंवाअंशतः नष्ट करण्याचा विशिष्ट हेतू होता, हेही सिद्ध करावेलागते. हा हेतू सिद्ध करणे कठीण असते आणि त्यालासहज आव्हान दिले जाऊ शकते. म्यानमारने लष्करीकारवाईचे रोहिंग्या बंडखोरांविरुद्धची ‘दहशतवादविरोधीमोहीम’ असे वर्णन करून समर्थन केले होते. आयसीजेचानिर्णय अत्याचाराच्या स्वतंत्र घटनांवरील अहवालांऐवजी‘पुराव्यांच्या समग्र मूल्यांकनावर’ आधारित आहे.नरसंहाराचा हेतू हाच एकमेव तार्किक निष्कर्ष असल्याचेन्यायालयाने म्हटले आहे.या निर्णयाने दोषींना शिक्षादेण्यासाठी आणि भविष्यातील उल्लंघन रोखण्यासाठीम्यानमारवर दबाव वाढेल. दुसरीकडे, इतर देशांसाठी हानिर्णय न्यायालयीन संदर्भाचा एक महत्त्वाचा आधार ठरतो.नरसंहार रोखण्यासाठी देशांच्या जबाबदाऱ्यांची आयसीजेकशा प्रकारे तपासणी करते, हे ठरवण्यास यामुळे मदतहोईल.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) जगातील या सर्वोच्च न्यायालयाकडेस्वतःचे पोलिस दल नाही. सरकारांनाआपल्या निर्णयांचे पालन करण्यास भागपाडणारी कोणतीही यंत्रणाहीत्याच्याकडे नाही. असे असूनही त्याच्यानिर्णयांचे नैतिक महत्त्व खूप मोठे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!



























Subscribe to my channel



