गेल्या पाच वर्षांत द. आशियात तरुणांच्या नेतृत्वाखाली 6 सत्ताविरोधी आंदोलने पाहायला मिळाली. या आंदोलनांनी या प्रदेशातील राजकीय चित्र मुळापासून बदलून टाकले आहे. या आंदोलनांमध्ये अनेक साम्ये होती. सर्वांमध्ये तरुणांच्या आकांक्षांची झलक होती, ती डिजिटल माध्यमातून संघटित झाली होती. शिवाय त्यात आर्थिक निराशा आणि सत्ताधारी वर्गाबद्दलचा भ्रमनिरास दिसून आला होता. मात्र, ज्या राजकीय व्यवस्थांमध्ये ही आंदोलने झाली, त्यांनी हा असंतोष वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला. त्यामुळे आंदोलनांचे परिणामही वेगळे राहिले. याची सुरुवात म्यानमारमधून होते. तिथे फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकले. प्रचंड निदर्शने झाली. नव्या सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांवर कारवाई केली. लोकशाही स्थापनेचा मार्ग बंद झाला. त्यामुळे तरुणांसमोर ‘सिव्हिलियन डिफेन्स फोर्स’ स्थापन करणे व वांशिक सशस्त्र संघटनांसोबत मिळून लढण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नाही. परिणामी, तिथे यादवी युद्ध सुरू झाले. मार्च 2022 मधील श्रीलंकेतील अरागालया आंदोलन आर्थिक दुर्दशेतून उभे राहिले. पेट्रोल पंपांवरील इंधन संपले होते. दीर्घकाळाची वीज कपात आणि आर्थिक दिवाळखोरी यामुळे राजपक्षे कुटुंबाच्या सत्तेची वैधता संपुष्टात आली. हे कुटुंब दोन दशकांपासून देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत होते. देशभरात निदर्शने झाली. अखेर आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनावरच ताबा मिळवला. मात्र, श्रीलंकेत फारशी हिंसा झाली नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी दबावात राजीनामा दिला. पाकिस्तानात मे 2023 मध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर दंगली उसळल्या होत्या. हे एक असे प्रकरण होते, ज्यात एका लोकप्रिय नेत्याच्या पाठीमागे जनआंदोलन उभे राहिले होते. याद्वारे लष्कराच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले जात होते. याला उत्तर म्हणून लष्कर तैनात करण्यात आले, इंटरनेट बंद करण्यात आले आणि विरोधकांची पक्षीय रचनाच संपुष्टात आणली गेली. वाढत्या राजकीय अलिप्ततेची किंमत मोजूनही पाकिस्तानची ‘हायब्रिड’ शासन व्यवस्था वाचवली गेली. बांगलादेशात जुलै 2024 मध्ये झालेला उठाव हे एका गोष्टीचे उत्तम उदाहरण होते. एक मर्यादित धोरणात्मक वाद, सरकारी नोकऱ्यांतील कोटा व्यवस्थेविरुद्ध विद्यार्थ्यांचा विरोध जनआंदोलनात कसा बदलू शकतो, हे यातून दिसले. शेख हसीना यांच्या हुकूमशाही सरकारविरोधात आंदोलन वाढले, तेव्हा संचारबंदी लागू करण्यात आली. लष्कर तैनात झाले आणि नियम मोडणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले गेले. पण, जेव्हा लष्करानेही हे आदेश पाळण्यास नकार दिला, तेव्हा हसीना यांना देश सोडून पळावे लागले आणि तिथे हंगामी सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 च्या निदर्शनांचे लक्ष्य कोणता एक नेता नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्ग होता. हा वर्ग एका दशकापासून पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी ‘म्युझिकल चेअर’ खेळत होता. दुसरीकडे, तरुण बेरोजगारी आणि संधीच्या अभावाशी झगडत होते. सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे निराश असलेली ‘जेन-झी’ पिढी भडकली. नेपाळी तरुणांनी व्हीपीएन आणि इतर ॲप्सचा वापर करत मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. सरकारने ती बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला. पण, आंदोलकांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर संसदीय रचना नष्ट न करता राजकीय उच्चभ्रू वर्गाला सत्तेबाहेर काढण्यात आले अन् 35 वर्षीय तरुणाला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. तर जुलै महिन्यात भारतात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली व्यापक निदर्शने झाली. याची सुरुवात प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून झाली. नंतर रोजगारहीन आर्थिक वाढीबाबत वाढत्या अस्वस्थतेमुळे त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. मात्र, भारतात या आंदोलनाने घटनात्मक व्यवस्थेला धोका निर्माण करण्याऐवजी उलट तिची बळकटीच दाखवून दिली. सरकारने काही महत्त्वाच्या सवलती दिल्या, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आणि प्रशासकीय तसेच धोरणात्मक सुधारणांचा प्रस्ताव ठेवला. जेणेकरून विरोधाची ऊर्जा पुन्हा एकदा प्रस्थापित लोकशाही मार्गांकडे वळवता येईल. हायपर-कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक-राजकीय अलिप्तता यांचा मेळ खूप ताकदवान असतो. डिजिटल जगात वाढलेली तरुण पिढी प्रस्थापित व्यवस्थांना बाजूला सारून मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करू शकते. आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत, आजचे तरुण आंदोलक ‘आपल्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही’ या भावनेने जास्त प्रेरित आहेत. ते सरकारी सवलतींना भुलत नाहीत आणि दडपशाहीला थेट सामोरे जातात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) राजकीय व्यवस्थांनी तरुणांची आंदोलने वेगवेगळ्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे या आंदोलनांचे परिणामही एकमेकांपेक्षा वेगळे राहिले. मात्र, 6 देशांपैकी भारताचा प्रतिसाद सर्वाधिक उल्लेखनीय राहिला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई हादरली! दोन तरुणांचा मृत्यू… आता ३०–४० कारखाने प्रशासनाच्या रडारवर!
पोलीस ठाण्याच्या दारातच तलवारी चालल्या! देऊळगाव राजा हादरलं!
सीमापुरीत इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू
देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



