पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तरुण अंगद, अभिमन्यूप्रमाणे निर्भय व संस्कारक्षम असावेत

अनादिकाळापासून जग तरुणांमध्ये आपले भविष्य पाहत आले आहे. जगभरातील तरुण जवळपास सारखेच आहेत. मात्र, भारतातील तारुण्य काहीसे विशेष ठरते. कारण, येथे संस्कार टिकून राहण्याची शक्यता अजूनही आहे. शिक्षण तर संपूर्ण जगभरात पसरत आहे, पण शिक्षणासोबतच संस्कारांचा आग्रह भारताच्या कणाकणात भिनलेला आहे. तरुणांबद्दल स्वामी विवेकानंद यांनी जे सांगितले, तीच गोष्ट स्वामी अवधेशानंद गिरीजी पुढे नेऊन सांगतात की, मानवतेच्या भविष्याचे प्राण हे तरुणच आहेत. जगातील पहिली युवा धर्म-संसद अंगद यांनी घेतली तीही रावणाच्या दरबारात. आजची परिस्थितीही बरीचशी तशीच आहे. अंगदाने रावणाच्या सभेत जो पाय रोवला होता, त्याची धमक आजच्या तरुणांनी ऐकायला हवी. रामायणातील अंगद व महाभारतातील अभिमन्यू ही आपल्या तरुणांची दोन आदर्श प्रतीके आहेत. युवा संसदेचा उद्देश हाच असायला हवा की, आपले तरुण अंगद आणि अभिमन्यूप्रमाणे निर्भय बनावेत आणि संस्कारी राहावेत.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *