
Pimpri-Chinchwad : लेह लडाख येथे पर्यटनाचा आनंद लुटू घरी परत येताना राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांची पार्थिवं विमानाने गुरुवारी १९ मार्च रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यात आली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघा मित्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकं काय झालं?
कुणाल किरण चोरडिया (रा. चिंचवड गाव), मयुरेश पांडुरंग पाडाळे (रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी) आणि सिद्धांत रमेश आल्हाट (रा. आल्हाटवस्ती, वाकड) अशी मृत तरुणांची नावं आहेत. शहरातील काही तरुण तीन कारमधून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लेह-लडाखला गेले होते. तेथून परत येत असताना राजस्थानात कोटाजवळ मुंबई-दिल्ली महामार्गावर एका कारला अपघात झाला. यात कारमधील तिघांनाही प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे प्रचंड बर्फवृष्टीमुळे कारगिल येथे सर्व तरुण आठ दिवसांपूर्वी अडकले होते. परंतु पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक नेत्यांनी ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांना तिथून सुरक्षित बाहेर काढले होते. यापैकी तिघांना परतीच्या प्रवासात मृत्यूने गाठल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कुणाल चोरडिया याच्यावर काळेवाडी स्मशानभूमी, सिद्धांत आल्हाट याच्यावर वाकड गावठाणातील स्मशानभूमी आणि मयुरेश पाडाळे याच्यावर म्हाळुंगे पाडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी या दु:खद प्रसंगाने वातावरण शोकाकुल झाले होते. तिघांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांना दु:ख अनावर झाले.
नेत्यांकडूनही श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही फेसबुकवरुन तिघा तरुणांना श्रद्धांजली वाहिली आहे. "लडाखची स्वप्नवत सहल आनंदाने सुरू झाली… पण परतीच्या प्रवासात आलेल्या त्या भीषण अपघाताने सर्व काही एका क्षणात हिरावून नेले. पिंपरी-चिंचवडमधील सिद्धांत आल्हाट, कुणाल चोरडिया आणि मयुरेश पाडळे या तिन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू ही मन सुन्न करून टाकणारी घटना आहे."
"आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे हसरे चेहरे आज कायमचे हरवले, ही वेदना शब्दांत मांडणं अशक्य आहे. हिंदू नववर्षाच्या प्रारंभी अशी दुर्दैवी घटना समोर आल्यामुळे पिंपरी-चिंचवडवर शोककळा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना या असीम दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना..!" अशा भावना शेळकेंनी व्यक्त केल्या आहेत.
अपघात झालेल्या मित्रांसोबत आणखी एक तरुण होता. परंतु मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने घरी परतला होता. जेव्हा त्याला अपघाताची माहिती समजली, तेव्हा मोठा मानसिक धक्का बसला.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




