
Pune : शहराच्या वेगवेगळ्या भागांत दुपारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने सलग दुसऱ्या दिवशी उन्हाची तीव्रता जाणवली नाही. दुपारनंतर ऊन आणि ढगाळ वातावरण असा खेळ सुरू होता. संध्याकाळी गार वारा सुटल्याने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळाले. त्यामुळे पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना उन्हाचा त्रास झाला नाही. पुणे शहराप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली.
पावसामुळे उन्हाचा तडाखा कमी
विदर्भ, मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात उष्णतेची लाट आली होती; तर पुण्यामध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली होती. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मार्चमध्ये एवढा तीव्र उन्हाळा; तर एप्रिलमध्ये काय होणार, अशी शहरात चर्चा सुरू असताना हवामानातील घडामोडींमुळे बुधवारी वातावरण बदलले. भोर, वेल्हे, नसरापूर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यातही काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला.
गुरुवारीदेखील सकाळी काही भागात आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारी दीडच्या सुमारास कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, सिंहगड रस्त्यावर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गुढीपाडव्याची सुट्टी असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची काही वेळासाठी धांदल उडाली; पण मध्यवर्ती पुण्यात बाजारपेठांमध्ये पाऊस नसल्याने नागरिकांनी खरेदीचा मुहूर्त चुकवला नाही. दुपारनंतर सगळीकडेच ढगाळ वातावरण होते. दिवसभरात कमाल ३४ आणि किमान १९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सर्वाधिक तापमान ३६.३ अंश सेल्सिअस लोहगावमध्ये नोंदवले गेले. सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस पडला. लातूरमध्ये गारपीट झाली.
खेड तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अवकाळी पावसाने कांदा झाकून ठेवताना प्रचंड धावपळ उडाली; तर अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा, गहू पिकाचेदेखील नुकसान झाले.
ठराविक ठिकाणीच पाऊस का?
पावसाळ्यात ढग मोठ्या आकारात तयार झालेले असल्याने एकाच वेळी सर्वदूर सरी बरसतात; पण उन्हाळ्यातील ढग आकाराने लहान असतात. ज्या भागात ढग तयार होतात, तेथे ते बरसतात, त्यामुळे प्रत्येक वेळी संपूर्ण शहरात एकाच वेळी पाऊस पडतोच असे नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून काही भागात जोरात पाऊस तर काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण असे चित्र बघायला मिळाले. गुरुवारी कोथरूड, वारजे माळवाडी भागात पाऊस पडला; तर मध्यवर्ती पेठा कोरड्या होत्या. पुढील दोन दिवस शहरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असून, काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




