अगदी लहानपणापासून काही मोजक्या जागा अशा आहेत, ज्या मला नेहमीच भारी वाटतात. तिथं जाणं येणं आनंदाचा भाग असतो. मग ते मामाच्या गावाला जायचो तिथलं महादेवाचं खूप जुनं मंदिर आणि तिथल्या चिंचेच्या झाडाला बांधलेला झोका असो किंवा अगदी घराजवळची भाजी मंडई. घरापासून अगदी चालत चालत जावं इतक्या जवळ! अगदी सुरुवातीलाच भरपूर फळांचे गाडे, थोडं पुढे मोठं पिंपळाच झाड आणि त्याच्याभोवती पार. त्या पारावर छोटंसं हनुमानाचं मंदिर. तिथून थोडं पुढे विड्याची पानं, सुपारी, फुलं असं पूजेचं साहित्य घेऊन बसलेली मंडळी. तिथून पुढे कुठे फळभाज्यांचे गाडे लावत असलेले काका, कुठे ओट्यावर हिरव्यागार भाज्यांवर पाणी शिंपडणार्या आजी. कुणी वजनाकरता वाद करतंय, कुणी हिशेब करतंय, कुणी घासाघीस करतंय, असे कितीतरी वेगवेगळे संवाद एकाच वेळी सुरू असायचे. शिवाय ग्राहकांना बोलवण्यासाठी एक सारखा ऐकू येणारा तारसप्तकामधला आवाज. तिथं फिरताना जाणवत राहणारा, मातीत मिसळलेला पाण्याचा, भाज्यांचा तो एक वेगळाच गंध! आठवतं तेव्हापासून कधी आईसोबत, आजीसोबत तर कधी बाबांसोबत भाजी आणायला गेले आहे, पण प्रत्येकासोबतचा अनुभव मात्र वेगळा असायचा. आजीसोबत गेले की, मला तिची पैसे ठेवायची छोटी पर्स देऊन टाकायची. मग जिथे भाजी घ्यायचो, तिथे मी बरोबर मोजून नोटा द्यायचे. सॉलिड वाटायचं. शिवाय येताना हमखास समोरच्या विष्णू मंदिरात किंवा थोडं पुढे दत्त मंदिरात घेऊन जायचे. मला हे रुटीन मोडलेलं अजिबात आवडायचं नाही. आजीसोबतची मंडईची भटकंती, ही मंदिरात न जाता पूर्ण व्हायचीच नाही! आईसोबत भाजी आणायला गेले की आधी तिच्या ठरलेल्या एका भाजीवाल्या मावशींकडे जायचो. त्या छान ओळखीचं हसायच्या. भाज्यांचे दर आईला पक्के माहीत असायचे, त्यामुळे थोडीफार घासाघीस व्हायचीच. तरीही, आई दरवेळी त्याच मावशींकडे भाजी घ्यायची आणि त्याही दरवेळी तेवढं आणि तसंच हसायच्या, बोलायच्या. मला आपलं छोट्या पिशव्या घेऊन मागे फिरायचं, इतकंच काम! थोडी मोठी झाले तशी आई मला बाबांसोबत भाजी आणायला पाठवायला लागली, पिशवीत यादी देऊन. बाबांना सगळं मार्केट फिरून यायला आवडायचं त्यामुळे त्यांच्यासोबत पार दुसऱ्या टोकापर्यंत चक्कर व्हायची. ते अगदी एखादा रुपयाही कमी न करता भाज्या घेऊन टाकायचे! संध्याकाळ होताना कधी गेलोच मार्केटला तर दिवसभर भाज्या न विकला गेलेला कुणी असेल तिथूनच भाजी घ्यायचे. माझं काम फक्त सगळी यादी घेतली आहे, हे पाहणे इतकंच असायचं. आता हे सगळं एकदम आठवलं, ते आज भाजी आणायला गेले तेव्हा. लग्नानंतर या भाजी मंडईत जाण्याच्या अनुभवात नवऱ्यासोबत भाजी घेण्याचा नवा अनुभव जोडला गेला. नजीकच्या दिवसातले काही विशेष प्रसंग, फ्रिजमधल्या उरलेल्या गोष्टी, खावेसे वाटणारे पदार्थ आणि दोघांच्या आवडीनिवडी या सगळ्याचा लसावी काढून मग भाजी घ्यायची! सुरुवातीला ही कसरत आम्ही ऑनलाइन करत असू, पण त्यामध्ये काही गंमतच नव्हती. अशातच आता घरापाशी शेतकऱ्यांकडूनच एक मंडई सुरू झाली असं कळलं आणि तिथे जाणं झालं. पालक, मुळा, लाल माठ, शेवगा, घेवडा किती नि काय काय! सगळी भाजी खरेदी करता करता उद्या काय करूया, ही भाजी लिंबू पिळून कशी लागते इथंपासून ते कवळी भेंडी कशी ओळखावी, किडका टोमॅटो, किडलेलं वांग कसं ओळखावं, अशा किती तरी गप्पा सुरू होत्या. त्या सगळ्यात भरलेल्या पिशव्या घेऊन आम्ही घराकडे निघालो. माझ्या मनात सोलापूरच्या मार्केटच्या या सगळ्या आठवणी भरून आलेल्या असतानाच हातातली भाजीची पिशवी स्वतःकडे घेत नवरा कानात कुजबुजला, "काय छान वाटलं हे. असं तुझ्यासोबत भाजी खरेदी करायला मला फार आवडतंय!" आणि एकदम हेही मार्केट मला तेवढंच आवडून गेलं!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकरवाडीतील ९६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून हिरवा कंदील, प्रत्येकाला मिळणार ५०० चौरस फुटाचा भूखंड
- यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- कोल्हापूर: गोकुळ निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचे स्पष्ट जाहीर करूनही एवढा त्रास का? मंत्री हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक सवाल!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!





























Subscribe to my channel




