कविता वाचून संपत नाही. आवडलेली कविता वाचून झाल्यावरही मनात रुणझुणत राहते. मग ती कुठल्याही रूपात असो, त्याने फरक पडत नाही. दीर्घकविता असो, वा हायकू! तिला हवं तेवढं मनसोक्त बागडते कविता मनभर. अशाच वाचल्यानंतरही आठवत राहणाऱ्या हायकूंचा एक फार उत्तम संग्रह नुकताच वाचला. तो म्हणजे विजय पाडळकर लिखित हायकूऋतू! ३००हून अधिक हायकू आहेत आणि शिरिष घाटे यांच्या समर्पक रेखाचित्रांनी पुस्तकाला एक छान वेगळेपण आलंय. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक छोटा हायकू आहे. तो काहीसा प्रस्तावनेसारखा भासतो. चंद्र घेऊन आला
चकोरासाठी चांदणे
माझ्यासाठी हायकू मी वाचलेला हा पहिलाच संग्रह, याआधी हायकू वाचण्यात आले होते, पण एक सबंध संग्रह वाचण्याचा अनुभव वेगळा होता. एखादी दुखरी आठवण उलगडणारा, एखाद्या क्षणाला शब्दात बांधणारा, कुठल्याशा चिरंतन वेदनेचा उच्चार करणारा असे इतके वेगवेगळे भाव असलेले हायकू एकत्र वाचणं आनंददायी होतं. प्रत्येक हायकूचा काही एक ठरीव अर्थ असेल असं नाही. तो ज्याला त्याला वेगळ्या अर्थानं भावणंही शक्य आहे. काही फार आवडलेल्या हायकूंबद्दल सांगायचं तर ‘श्रावणहायकू’पैकी एकात कवी म्हणतात, माहेरनाते
नभातल्या पाण्याचे
सागरजळाशी किती छान कल्पना मांडलीये! समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि तिच्यामुळे पाऊस पडतो हे विज्ञानात शिकलेलं जलचक्र खरंतर, पण समुद्राच्या जळाला पावसाच्या पाण्याचं माहेर म्हणणं किती गोड आहे! पण ह्याच भागात आणखी एका हायकूमधे एका कदाचित दुखावलेल्या काहीशा कोरड्या मनाचं श्रावणाच्या लोभस असण्यापासूनचं राखलेलं अलिप्तपण येतं. कवी म्हणतात, चिंब बरसातीत
कोरडे मन
आला गेला श्रावण वाटेचे हायकूमधे ते म्हणतात, पाखराची वाट
आकाशी लपून
ज्याची त्याने शोधावी खूण
केवढं तरी खरंय! ज्याला त्याला आपापल्या वाटा आणि गंतव्य शोधावं तर लागतच पण त्या वाटा जपणारी खूणही शोधावी लागते. पाखराला आकाशातून मनसोक्त विहरताना त्याची त्याची वाट जिथे आहे ती खूण गवसते तशी आपल्यालाही गवसेल फक्त शोधणं हवं! ‘प्रवासाचे हायकू’मधे असलेला एक हायकू मला फार भावला. अदृश्य झाले
कॅमेरा शोधताना
इंद्रधनुष्य आजकाल आहे तो क्षण अनुभवण्यापेक्षा पुन्हा पाहण्यासाठी कैद करण्याची घाई खूप करतो आपण, नाही का? समोरचं सुंदर इंद्रधनुष्य हे त्या क्षणी मनसोक्त आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी असतं, त्याचे नितांत सुंदर रंग मनात साठवण्यासाठी असतं हे कधी कसे विसरून गेलो आपण मोबाइलची मेमरी भरताना? आणि मग हे वाचून होतं न होतं तोच हा आहे तो क्षण एका क्षणापुरताच वर्तमान आहे हे पुन्हा सांगायला कवी विसरत नाहीत. ते ‘विखुरलेले हायकू’मधे म्हणतात, क्षण बनला
एक आठवण
क्षणार्धात या इतक्या सुंदर संग्रहाला तितकाच समर्पक समारोप देताना कवी एक छोटीशी प्रार्थना करतात. अंतिम क्षणी
मनात उरावे थोडे रंग
मागणे एवढेच हे इतकं तरल आणि नेमकं काही कवीच मागू शकतो. एकूणात अनेक छोट्या छोट्या अनुभवांना, भावनांना, दुःखांना, वेदनांना, इच्छांना अवघ्या तीन ओळींमधून आपल्या ओंजळीत ठेवत आपल्या मनात विचारांचे कितीतरी तरंग उठवणाऱ्या हायकूंचा हा एक वाचनीय संग्रह आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




