आज ग्राहकांसमोर अनेक पर्याय आहेत. ऑनलाइन काही मिनिटांत उत्पादनांची तुलना करता येते, माहिती मिळते आणि व्यवहार देखील पूर्ण होतात. पण, जीवन विम्याचा विषय येतो, तेव्हा फक्त विम्याचा हप्ता भरणे इतकेच महत्त्वाचे नसते. विमा खरेदी हा भावनांशी जोडलेला निर्णय आहे. ग्राहकाला मनापासून खात्री आणि विश्वास वाटत नाही, तोपर्यंत तो हा निर्णय घेत नाही. यामुळे जीवन विमा इतरांपेक्षा वेगळे ठरते. इतर आर्थिक उत्पादनांच्या तुलनेत जीवन विम्याचे खरे महत्त्व अनेक वर्षांनंतर किंवा दशकांनंतर समोर येते. जीवनातील प्रियजनांप्रती जबाबदारीमुळे व्यक्ती जीवन विमा घेण्याचा विचार करतात. आज विम्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. पण ग्राहकाला ‘घेतलेला जीवन विमा कुटुंबाच्या भविष्यासाठी योग्य आहे का?' याबाबत खात्री पाहिजे. भारतातील जीवन विम्याच्या संरक्षणाची संधी याच दृष्टिकोनातून पाहिली गेली पाहिजे. गेल्या एका दशकात बँकिंग सेवा घराघरांपर्यंत पोहोचल्या, लाखो कुटुंबे औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडली गेली आहेत. पण, आजही भारतातील सुमारे 87 टक्के व्यक्तींकडे पुरेसे विमा संरक्षण नाही. 18 ते 35 वर्षे वयोगटात हे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती पाहता केवळ माहिती देऊन चालणार नाही, तर ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करणे गरजेचे आहे. यासंदर्भात बँकाशुरन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. ग्राहकाच्या परिस्थितीबाबत माहित असण्याचा फायदा ग्राहकांच्या आयुष्यामध्ये बँकेचे अद्वितीय महत्त्व असते. पहिले सॅलरी अकाउंट उघडणे आणि घरासाठी कर्ज घेण्यापासून ते मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीचे नियोजन करण्यापर्यंत बँका आयुष्यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर सोबत असतात. या वर्षांनुवर्षांच्या व्यवहारांमुळे बँकेला ग्राहकाच्या गरजा, जबाबदाऱ्या आणि आर्थिक क्षमता माहित होतात. ही परिस्थिती माहित असण्याला खूप महत्त्व आहे. विम्याची चर्चा बँकेसोबत विश्वासाच्या नात्यातून सुरू होते, तेव्हा विमा घेण्याबाबत अधिक विचार केला जातो. ही चर्चा केवळ विम्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ठरवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करणे, प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिक स्थिरता निर्माण करणे या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. बँकेचा विश्वास आणि विमा संरक्षण यांचा संगम बँकाशुरन्सला वैशिष्ट्यपूर्ण बनवतो. ग्राहकांसाठी, विमा समजणे व खरेदी करणे अधिक सोपे जाते. हा विश्वास बाजारपेठेतील वाढीमधून दिसून येतो. 2024 मध्ये सुमारे 105 अब्ज अमेरिकन डॉलर्स अंदाजित असलेली भारतातील बँकाशुरन्स बाजारपेठ 2033 पर्यंत जवळपास 180 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बाजारपेठेत वाढ होत आहे, पण त्यासोबत व्यक्तींना माहित असलेल्या आणि त्यांचा विश्वास असलेल्या बँकेवरील निरंतर विश्वास देखील महत्त्वाचा आहे. फक्त जीवन विमा घेण्यास मदत नाही तर मार्गदर्शन महत्त्वाचे बँकाशुरन्सचे यश यापुढे केवळ पॉलिसी विकण्यावर अवलंबून नसेल, तर ग्राहकाला अचूक निर्णय घेण्यास मदत करण्यावरून ठरेल. बहुतेक ग्राहकांना विमा पाहिजे, पण त्यांच्या मनात काही साधे प्रश्न असतात, जसे माझ्यासाठी किती रकमेचे विमा संरक्षण पुरेसे आहे? वयानुसार आणि गरजेनुसार कोणता पर्याय योग्य ठरेल? बचत, गुंतवणूक आणि इतर खर्चांसोबत विम्याचा ताळमेळ कसा राखावा? बाजारपेठेत पर्याय जास्त असतील तर तितकीच योग्य मार्गदर्शनाची गरज जास्त असते. नेटवर्क मोठे आहे किंवा उत्पादन पोर्टफोलिओ मोठा आहे अशा संस्थांपेक्षा ग्राहकांना आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेण्यास मदत करणाऱ्या संस्था दीर्घकालीन मूल्य निर्माण करतील. यासाठी यशाचा अर्थ केवळ व्यवसायाची वाढ एवढाच न ठेवता बाजारपेठेतील स्थितीला देखील तितकेच महत्त्व दिले पाहिजे. समाधानाची बाब म्हणजे, या उद्योगाने लक्षणीय प्रगती केली आहे. पॉलिसींच्या संख्येत मोठी वाढ होऊनही प्रति 10,000 जीवन विमा पॉलिसींमागे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण आर्थिक वर्ष 2015 मधील 108 वरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 42 पर्यंत खाली आले आहे. यामधून पारदर्शकता, सुयोग्यता आणि ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी विमा कंपन्या, बँका आणि नियामकांनी सातत्याने केलेले प्रयत्न दिसून येतात. म्हणजेच, ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिल्यास विश्वास अधिक दृढ होत जातो. विश्वास हीच सर्वात मोठी जबाबदारी विश्वासाकडे अनेकदा केवळ व्यावसायिक फायदा म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात, बँका आणि विमा कंपन्या या दोघांचीही सामायिक जबाबदारी आहे. प्रत्येक सल्ला, सेवेचा अनुभव आणि क्लेम मिळण्याची सोपी पद्धत यांमुळे ग्राहकांनी आर्थिक संस्थांवर दाखवलेला विश्वास अधिक दृढ होतो. तंत्रज्ञानामुळे ग्राहकांच्या गरजा समजणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे सोपे झाले आहे. पण, जीवन विमा माणसांच्या भावनांशी जोडलेला आहे. प्रत्येक पॉलिसीमागे आपल्या सुरक्षित भविष्याची आशा बाळगणारे कुटुंब, मुलांसाठी नियोजन करणारे आई-वडील आणि आयुष्यभराच्या मेहनतीची कमाई जपणारी व्यक्ती उभी असते. सर्वात यशस्वी बँकाशुरन्स मॉडेल तंत्रज्ञानाचे साह्य घेण्यासोबत माणसाच्या अनुभवाचा योग्य वापर करून ग्राहकांना महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल. आज भारतात प्रत्येकापर्यंत विमा पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे बँका आणि विमा कंपन्यांसमोर विमा अधिक सोपा, गरजेनुसार आणि सर्वांना समजेल असा बनवण्याची मोठी संधी आहे. शेवटी, आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर ग्राहकाला देणाऱ्या आत्मविश्वासावरून बँकाशुरन्सचे यश ठरेल. बँकाशुरन्सचा नवीन टप्पा केवळ विमा पॉलिसी विकण्याने सुरू होणार नाही, तर दृढ नाती, मिळवलेला विश्वास आणि कटिबद्धतेच्या पूर्ततेसह यशस्वी होईल. व्यक्तींचे भविष्य सुरक्षित करण्यामध्ये विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. (लेखक इंडियाफर्स्ट लाइफचे बँकाशुरन्सचे चीफ डिस्ट्रिब्यूशन ऑफिसर आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



