पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आंतरिक आनंद हवा असेल ‎तर आस्तिकता स्वीकारा

जो आपल्या जीवनाचे ध्येय नाकारतो, त्याच्यात नास्तिकता शिरकाव‎करू लागते. कोणीही असेच नास्तिक होत नाही. जेव्हा तो‎परमशक्तीला प्राप्त करण्याच्या आव्हानाकडे पाठ फिरवतो, तेव्हा तो‎नास्तिक होतो. ईश्वराचा शोध किती महत्त्वाचा आहे, हे समजून‎घ्यायचे असेल तर नास्तिकाला विचारा; आस्तिक ते सांगू शकणार‎नाही. कारण त्याने ईश्वराचा स्वीकार केला नाही, म्हणूनच तो नास्तिक‎बनला आहे. त्याने ते नाकारले आणि त्याकडे पाठ फिरवली. आस्तिक‎तर थेट सांगेल की, माझा विश्वास आहे आणि मी शोध घेत आहे. मी ते‎आव्हान स्वीकारले आहे. ईश्वराचे अस्तित्व स्वीकारण्याच्या या‎आव्हानालाच भक्ती म्हणतात. नास्तिक आपल्या अहंकार आणि‎अज्ञानामुळे देव नाही, अशी घोषणा करतो, पण आस्तिक म्हणतो की,‎मी त्याचा स्वीकार केला आहे, त्यामुळे माझ्या जीवनातील आनंद‎वाढला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले लोक ईश्वराला मानत‎नाहीत, पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात कठीण संकटे येतात, तेव्हा त्यांना‎एका अदृश्य शक्तीची जाणीव होते. आंतरिक आनंद हवा असेल तर‎आस्तिकता स्वीकारायला हवी.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *