भारतामध्ये विविध प्रजातींचे साप आढळतात, त्यामध्ये काही हे विषारी असतात, तर काही निमविषारी तर काही हे बिनविषारी असतात. मात्र अनेक प्रजातीच्या सांपामध्ये बऱ्यापैकी साम्य दिसत असल्यानं कोणता साप हा विषारी आहे? आणि कोणता साप बिनविषारी आहे? हे ओळखण्यात आपण मोठी चूक करतो, अशा परिस्थितीमध्ये विषारी सापांचा दंश झाला तर त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो, जर उदाहरण द्यायचं झालं तर अजगर आणि घोणस या दोन सांपामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. अजगर हा बिनविषारी साप असतो, तर घोणास हा अत्यंत विषारी साप असतो, अनेकजण अजगर समजून घोणसला पकडतात, मात्र हा साप अत्यंत विषारी असल्यामुळे त्याचा दंश हा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोणताही साप घरात किंवा इतर कुठेही निघाला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, साप कोणताही असो, विषारी, बिनविषारी त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते या सापांना पकडून त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडतील.
अनेकदा पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे आणि उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे साप सुरक्षित अधिवास शोधत असतात. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप हे नेहमी थंड जागेच्या शोधात असतात. अशा स्थितीमध्ये जर आपल्या घरात काही अडचण असेल, किंवा जिथे दाट झाडी झुडपं असतील अशा ठिकाणी साप गारव्याला येऊ बसतात, अशावेळी सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात. साप घरात येऊ नये, यासाठी अनेक उपाय योजना आहेत, त्यामध्ये घर नेहमी स्वच्छ ठेवणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, गवत न वाढू देणे या काही गोष्टी सांगता येतील.
मात्र याही पलीकडे जाऊन सापांसाठी ग्रामीण भगांमध्ये एक उपाय केला जातो, तो म्हणजे जर घरात साप निघाला असेल तर जनावरांचं शिंग जाळलं जातं. जनावराच्या शिंगाला तीव्र असा वास असतो, ज्यामुळे साप घरात थांबत नाही, असं मानलं जातं. यासाठी आजही ग्रामीण भागातील लोक जर एखादं जनावर मृत झालं असेल तर त्याचे शिंग जपून ठेवतात, जर एखाद्या घरात साप शिरला असेल आणि तो दिसत नसेल तर अशा स्थितीमध्ये जनावराचं शिंग जाळलं तर त्याच्या वासामुळे साप घरातून बाहेर पडतो, आणि पुन्हा त्या परिसरात येत नाही असं मानलं जातं. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी, साप कुठेही निघाला तरी तो स्वत: पकडण्याचा प्रयत्न करू नये, त्याची माहिती लगेच सर्पमित्रांना द्यावी, तसेच जर समजा चुकून सर्पदंश झाला तर साप कोणताही असो, विषारी, बिनविषारी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
शहर
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- पुणे: रेल्वे यार्डात २ ऑगस्टला नऊ तासांचा ब्लॉक; ७ गाड्या रद्द, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल
महाराष्ट्र
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- हिंगोली: कळमनुरीत कयाधू नदीला महापूर; सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ६ गावांचा संपर्क तुटला, शेकडो हेक्टरमधील पिके पाण्याखाली
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




