पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याचा ट्रम्प यांचा निर्णय आता औपचारिकपणे लागू झाला आहे. या महिन्यात त्यांनी अमेरिका 31 संयुक्त राष्ट्र संघटना आणि 35 गैर-संयुक्त राष्ट्र संघटनांसह इतर 66 आंतरराष्ट्रीय संघटनांपासून माघार घेत असल्याचे जाहीर केले. इतिहासात कधीही एखाद्या राष्ट्रीय नेत्याने केवळ एका महिन्यात इतक्या व्यापक आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंध तोडले नाहीत. तसेच कोणत्याही नेत्याने कधी इतके स्पष्टपणे म्हटले नाही की त्याला आता आंतरराष्ट्रीय कायद्याची गरज नाही. ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. अमेरिकेवर नियम व कायदे कधी लागू होतील हे आपण स्वत: ठरवू, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या कठोर धोरणांमुळे आधीच नुकसान होऊ लागले आहे. गेल्या वर्षभरात ट्रम्प प्रशासनाने जागतिक मानवतावादी मदत व आरोग्य कार्यक्रमांसाठी निधीतमोठी कपात केली आहे. त्यामुळे - सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटनुसार - दरवर्षी अंदाजे दहा लाख अतिरिक्त मृत्यू होण्याची अपेक्षा आहे. बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ आणि इतर संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की अमेरिका आणि युरोपकडून मदत कपात केल्याने 2030 पर्यंत विकसनशील देशांत 2.26 कोटी अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात - त्यात पाच वर्षांखालील 54 लाख मुले समाविष्ट आहेत.अलिकडच्या घडामोडींवरून असे दिसून येते की आंतरराष्ट्रीय मदतीमध्ये आणखी कपात केली जाईल. ट्रम्पबद्दल आम्हाला आधीच माहिती होते की त्यांचे प्रशासन युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्तराष्ट्र निर्वासित संस्था, संयुक्त राष्ट्रांची मदत आणि कार्यसंस्था जवळच्या पूर्वेतील पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी आणि संयुक्त राष्ट्रांची लोकसंख्या निधी यासारख्या जागतिक संस्थांना लक्ष्य करेल. परंतु आता हेही स्पष्ट झाले की हवामान बदलावर करार करण्यासाठीच्या चौकटीचा त्याग करणारा अमेरिका पहिला देश बनेल. ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’ याच्या व्याप्तीचे देखील दूरगामी परिणाम होतील. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रयत्नांना पर्याय म्हणून ते ठेवण्याचा प्रयत्न हा एक मोठा बदल आहे. कायदा आयोग, युरोप परिषदेचा व्हेनिस आयोग, लोकशाही आणि निवडणूक सहाय्य संस्था आणि न्याय आणि कायद्याचे नियम यासारख्या आंतरराष्ट्रीय कायद्यांना वचनबद्ध असलेल्या संस्थांवर हल्ला करणे, भविष्यातील अमेरिकन कृतींच्या वैधतेसाठी वाईट संकेत देते. ट्रम्प प्रशासनाचा हा युक्तिवाद की ही पावले खर्च कमी करणे आणि जागृत अजेंडाचा प्रतिकार करणे हा आहे हे देखील निराधार दिसते. महिलांच्या समानतेचे आणि मुलींच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या संस्थांपासून माघार घेण्याचा अर्थ काय? यूएन वुमन सारख्या संस्थेने 80 हून अधिक देशांना जेंडर-संवेदनशील बजेट विकसित करण्यास मदत केली आहे. त्यास अनावश्यक आणि निरर्थक कसे मानले जाऊ शकते? त्याची भगिनी संस्था, यूएनएफपीएमातृ आरोग्यास समर्थन देते. एज्युकेशन कान्ट वेट(याचे अध्यक्ष पद मी सांभाळले) लाखो निर्वासित आणि विस्थापित मुलांना शिक्षणाची सुविधा प्रदान करते. अशा संस्थांना पुरेसा निधी मिळाला नाही तर जगातील सर्वात असुरक्षित महिला आणि मुलींना हिंसाचार आणि मातृ मृत्यूचा धोका जास्त असेल. ट्रम्प प्रशासनाचा गैरसमज आहे की अमेरिकन नागरिकदेखील आंतरराष्ट्रीय संस्थांना नष्ट करण्याच्या त्यांच्या धोरणांना समर्थन देतात. उलटपक्षी वास्तव असे आहे की बहुसंख्य अमेरिकन लोकांना जगातील राष्ट्रांनी सामान्य समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करावे असे वाटते. 34 देशांतील एका सर्वेक्षणात 90 टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी म्हटले की जागतिक आरोग्य, मानवी हक्कांचे संरक्षण आणि संघर्ष रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. जागतिकस्तरावर 60 टक्के लोकांनी जागतिक आरोग्य संघटनेवर विश्वास व्यक्त केला. 58 टक्के लोकांनी संयुक्तराष्ट्रांवरही विश्वास व्यक्त केला. अमेरिका याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) ट्रम्प प्रशासनाचा गैरसमज आहे की अमेरिकन नागरिकदेखील आंतरराष्ट्रीय संघटना नष्ट करण्याच्या त्यांच्या धोरणांना पाठिंबा देतात. परंतु बहुसंख्य अमेरिकन लोकांना जगातील राष्ट्रांनी एकत्र काम करावे असे वाटते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




