6 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

फंडा असा आहे की, २०२६ हे वर्ष कामाच्या ठिकाणी अधिक आव्हानात्मक असणार आहे, कारण आपण एआयच्या जगात पाऊल ठेवत आहोत. जे लोक हे बदल स्वीकारतील, तेच पदोन्नतीच्या शर्यतीत पुढे राहतील. केंद्रीय कामगार मंत्रालयाने गिग वर्कर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देत “१० मिनिटांत डिलिव्हरी’ प्रथा रोखण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच २०२६ मध्ये कामाच्या ठिकाणी अनेक बदल पाहायला मिळू शकतात. हे वर्ष ऑटोमेशन, एआय एजंट्सचा व्यापक वापर आणि औद्योगिक विवादांनी प्रभावित असेल असे मानले जात आहे. हे बदल नेमके कसे असतील? तर याची पहिली चाचणी तुमच्या प्रामाणिकपणावर होणार आहे. १. मी हे एका कंपनीच्या अंतर्गत परिपत्रकावरून स्पष्ट करतो. कंपनीच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग दिवसातून किमान २० मिनिटे पाहावे अशी माझी इच्छा आहे. गरज पडल्यास एका व्यक्तीला २४x७ देखरेखीसाठी ठेवा.’ याचा अर्थ असा की, जेव्हा कुणी पाहत नसते तेव्हा तुम्ही काय करता? आपल्या मूळ मूल्यांशी बांधील राहणे आता अनिवार्य होईल. २. एआय आता अर्धा कर्मचारी बनत आहे. व्यवसाय आता माणसांप्रमाणेच एआयला प्रशिक्षण देण्यास तयार आहेत. कंपन्या तयार सिस्टिम खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या गरजेनुसार ‘टेलर-मेड’ एआय सिस्टिम विकसित करण्यावर भर देत आहेत. ३. जर तुम्ही लीडर असाल, तर तुम्हाला चॅटजीपीटीपेक्षा चांगले व्हावे लागेल. एआयने कमालीची पारदर्शकता आणली आहे. उत्पादन विभागात काम करणाऱ्यांनाही आता ग्राहकांच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. ग्राहकांना चॅटजीपीटीपेक्षा अधिक अचूक आणि मानवी उत्तरे हवी आहेत. ४. आता सीव्हीच जुने झाले नाहीत, तर पदव्या आणि पदांचा प्रभावही कमी होत आहे. कंपन्यांना त्यांचे लीडर्स ‘इन्फ्लुएन्सर’ असावेत असे वाटते. जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक कौशल्याने इतरांवर प्रभाव टाकू शकत नसाल, तर तुम्ही स्पर्धेबाहेर फेकले जाल. ५. नवीन कर्मचारी आता ‘टेस्टर इंटर्नशिप’ शोधत आहेत. पदवीधर विद्यार्थी प्रथम सहा आठवडे वेगवेगळ्या क्षेत्रांत इंटर्नशिप करून अनुभव घेतील आणि मगच करिअर ठरवतील. दुसरीकडे, नियोक्ता पूर्णवेळ नोकरीच्या खर्चाशिवाय सखोल तज्ज्ञता असलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट’ आधारित टॅलेंटच्या शोधात आहेत. ६. कंपन्या आता तुम्हाला नाही, तर तुमची वृत्ती (Attitude), चारित्र्य आणि कंपनीच्या संस्कृतीत मिसळण्याची तुमची क्षमता पाहून एखाद्याची नियुक्ती करत आहेत. कौशल्ये शिकवता येतात, पण स्वभाव नाही, हे आता कंपन्यांना उमजले आहे. ७. ‘ब्ल्यू कॉलर’ मुले पुन्हा जोमाने परतताना दिसत आहेत. कुशल कामगार आता कोडिंग इंजिनिअर्सपेक्षा जास्त कमावत आहेत आणि ते कर्जमुक्त आयुष्य जगत आहेत. गेल्या वर्षापर्यंत ज्या नोकऱ्या खालच्या दर्जाच्या मानल्या जात होत्या, त्या आता पहिली पसंती बनत आहेत. ८. कर्मचारी आता मीटिंगमध्ये केवळ स्वतःचे मत मांडणार नाहीत, तर ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे संदर्भ घेऊन येतील. बोर्डरूममध्ये आता व्यवसायाचा मूळ हेतू आणि मूल्यांवर आधारित चर्चांना अधिक महत्त्व दिले जाईल. ९. नियोक्ते अशा कर्मचाऱ्यांना अधिक पसंती देतील जे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपले काम अधिक सुलभ आणि वेगवान करू शकतात. १०. ‘ऑर्केस्ट्रेटर’: नियोक्ते अशा लीडर्सना पसंत करतील जे केवळ कामाच्या अंमलबजावणीपेक्षा समन्वयावर अधिक भर देतील. त्यांच्यासाठी ‘ऑर्केस्ट्रेटर’ हे नवीन जॉब टायटल असेल.

तुमच्या मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
This post was originally published on this site.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



