अनेकदा आपल्या युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या पालकांना आपल्या साथीदारांकडून असे शब्द ऐकून अभिमान वाटला असेल की, ‘वाह, तुमचं मूल तर ब्रिलियंट असेल! त्या मुलाखतींमध्ये यशस्वी होणं सोपं नाही!’ किंवा किटी पार्टीमध्ये महिला म्हणत असतील, ‘अरे, आता तर त्यांची लाइफ पूर्णपणे सेट आहे! ही खूप मोठी कामगिरी आहे!’ किंवा हाउसिंग सोसायटीमध्ये राहणारे ओळखीचे लोक लिफ्टमध्ये म्हणत असतील, ‘तुम्हाला त्यांचा किती अभिमान वाटत असेल! ते अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत, ज्याचा वापर संपूर्ण जग दररोज करतं.’ यासाठी आपण सर्वांनी त्या महिलेचे आभारी असले पाहिजे, जिने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला जगातील सर्वात प्रतिष्ठित, आकर्षक वेतन असलेल्या आणि सन्माननीय व्यवसायांपैकी एक बनवण्यात योगदान दिले. चला, त्यांची कहाणी जाणून घेऊया. 1965 मध्ये त्या गणितात पीएचडी करण्याची तयारी करत होत्या. तेव्हाच त्यांच्या पतीची नजर एमआयटी इन्स्ट्रुमेंटेशन लॅबोरेटरीच्या जाहिरातीवर पडली. संस्थेला अशा लोकांचा शोध होता, जे मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर विकसित करू शकतील. त्या काळात कोड लिहिण्याला वास्तविक इंजिनिअरिंगऐवजी अनेकदा क्षुल्लक काम समजले जात असे. असे असूनही त्यांनी आपल्या शिक्षणाची योजना सोडून दिली आणि अपोलो प्रकल्पाच्या पहिल्या आणि एकमेव महिला प्रोग्रामर बनल्या. पुढील चार वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला, त्यांनी दुसरे लग्न केले आणि मग त्यांचा दुसरा घटस्फोटही झाला. या काळात त्या एक सिंगल मदर म्हणून मुलगी लॉरेनला सोबत कामावर घेऊन जात असत.एके रात्री लॉरेन अॅस्ट्रोनॉट बनून खेळत होती. मार्गारेटने तिला त्या हार्डवेअर सिम्युलेटरवर खेळू दिले, ज्यावर त्या काम करत होत्या. खेळता-खेळता लॉरेनने चुकून काही बटणे दाबली आणि नेव्हिगेशनशी जोडलेला सर्व डेटा नष्ट झाला. पण मार्गारेटला याचा राग आला नाही. त्यांना जाणीव झाली की एखादा अंतराळवीरही नकळत अशीच चूक करू शकतो. आता थेट 20 जुलै 1969 वर येऊया. अपोलो-11 मिशनवर गेलेले तीन अमेरिकन अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे पहिले मानव बनण्यापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर होते. (यातील 2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, 1 लूनर ऑर्बिटमध्ये उपस्थित होते), तेव्हाच त्यांच्या लूनर मॉड्यूलमध्ये अलार्म वाजू लागला. यामुळे त्या ऐतिहासिक क्षणाच्या अपयशी होण्याचा धोका निर्माण झाला, तर जगभरात त्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लूनर मॉड्यूल ‘ईगल’ला आपली उंची आणि गतीची गणना करण्यासाठी केवळ लँडिंग रडारची गरज होती. त्याला रॅंदेवू रडारची गरज नव्हती. या रडारचा वापर वरच्या कक्षेत प्रदक्षिणा घालणाऱ्या कमांड मॉड्यूलच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. पण क्रूच्या चेकलिस्टने बज आल्ड्रिनला रॅँदेवू रडार ऑटो मोडवर करण्याचा निर्देश दिला. सुरक्षेच्या दृष्टीने जाणीवपूर्वक असे केले होते, पण यामुळे इलेक्ट्रिकल बिघाड निर्माण झाला. प्रोग्रामिंग क्षेत्रातील पुरोधा मार्गारेट हॅमिल्टन यांनी या संकटाची शक्यता आधीच ओळखली होती. त्यांना याचा धडा आपल्या मुलीच्या त्या चुकीतून मिळाला होता. याच कारणामुळे हॅमिल्टनच्या सॉफ्टवेअरने ही चूक दुरुस्त करून लँडिंग निर्बाध होऊ दिले. जेव्हा मिशन कमांडर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावरून ती प्रसिद्ध घोषणा केली की, ‘द ईगल हॅज लँडेड’, तेव्हा अनेक हात टाळ्या वाजवण्यासाठी नक्कीच उठले, पण अनेकांच्या नजरा मार्गारेट हॅमिल्टन यांच्याकडेही वळल्या. 2016 मध्ये जेव्हा बराक ओबामा यांनी मार्गारेट यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ने सन्मानित केले, तेव्हा ते म्हणाले- ‘20 जुलै 1969 रोजी आपल्या अंतराळवीरांकडे जास्त वेळ नव्हता. पण सुदैवाने त्यांच्याकडे मार्गारेट हॅमिल्टन होत्या!’ त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीने लोकांचे लक्ष सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या कामाकडे वेधले. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “मी सॉफ्टवेअरला एक वैध इंजिनिअरिंग क्षेत्र म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, जेणेकरून सॉफ्टवेअर आणि ते बनवणाऱ्यांना त्यांचा योग्य सन्मान मिळू शकेल.” त्यांनी हेही मान्य केले होते की जेव्हा त्यांनी ‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग’ या शब्दाचा वापर सुरू केला, तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवत असत. 30 सप्टेंबर 2026 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी मॅसॅच्युसेट्सच्या केंब्रिज येथील एका रुग्णालयात मार्गारेट यांचे निधन झाले. फंडा असा की- दैनंदिन जीवनातील ज्या आव्हानांवर अनेकदा कुणाचे लक्षही जात नाही, खरे इनोव्हेटर्स त्यांनाच मानवी प्रगतीच्या ऐतिहासिक टप्प्यांमध्ये बदलून टाकतात. विसरू नका की एका आईची तीक्ष्ण नजर आणि अथक समर्पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या भविष्यालाही आकार देऊ शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




