पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण आणि स्थानिक नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, पुणे आरएमसी असोसिएशनने बुधवारपासून प्रकल्प बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, हे प्रकल्प दिवसा बंद असल्याचे दाखवून रात्रीच्या वेळी जोमाने सुरू असल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीमुळे संतापलेल्या पुणे महानगरपालिकेने (PMC) आता अशा प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे.
नेमके प्रकरण काय?
आरएमसी प्रकल्पांमुळे हवेचे प्रदूषण वाढले असून परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. लोहगाव, वाघोली, वडगाव खुर्द आणि धायरी यांसारख्या भागांत नागरिक श्वसनाच्या आजारांनी त्रस्त आहेत. या तक्रारींची दखल घेत आरएमसी असोसिएशनने "आत्मपरीक्षणासाठी" प्रकल्प काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात रात्रीच्या अंधारात डंपर आणि मिक्सरच्या फेऱ्या सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे.
राजकीय दबाव आणि कारवाई:
वडगाव खुर्द येथील काही प्रकल्प एका बड्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांचे असल्याने, महापालिकेच्या कारवाईत वारंवार अडथळे येत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. यापूर्वी नियोजित असलेली कारवाई अचानक रद्द करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष आहे.
आयुक्तांचे स्पष्ट निर्देश:
या संपूर्ण प्रकारावर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. "आरएमसी प्रकल्पांवरील थांबलेली कारवाई पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता, नियम मोडणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल," असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा:
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या वडगाव खुर्द परिसरातील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका केवळ दिखाव्यासाठी कारवाई करते, असा आरोप करत रहिवाशांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel




https://shorturl.fm/birKo