कोल्हापूर / आदमापूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या (Sant Sadguru Balumama Devasthan Trust) जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी एक मोठी व महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या धडक कारवाईत, आदमापूर परिसरातील पार्किंग व इतर जमिनी कवडीमोलाने (अक्षशः लाख रुपयांत) खरेदी करून नंतर कोट्यवधी रुपयांना बाळूमामा देवस्थानला विकणाऱ्या पाच मध्यस्थींना (दलालांना) आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या संपूर्ण भूमी खरेदी-विक्री प्रकरणामध्ये जवळपास ११ कोटी रुपयांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानच्या नावाने जमिनी खरेदी करताना प्रचंड अनियमितता करण्यात आली. मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत ट्रस्टच्या माध्यमातून झालेल्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये आणि मेंढ्या-बकऱ्यांच्या व्यवहारांत मोठे घोटाळे झाल्याचे लेखापरीक्षण (Audit) अहवालातून उघडकीस आले होते. याप्रकरणी यापूर्वीच भुदरगड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने एक विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले होते.
एसआयटीच्या तपासामध्ये असे समोर आले की, काही दलालांनी आणि मध्यस्थांनी अत्यंत कमी किमतीत जागांचे व्यवहार करून तीच जमीन देवस्थानला अव्वाच्या सव्वा कोटी रुपयांना विकली आणि यादरम्यान कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार केला. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत मुरगुड आणि निढोरी परिसरातील पाच संशयित मध्यस्थांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भीष्म जोतीराम पाटील (वय ३६, रा. मुरगूड), सागर महादेव शिंदे (वय ४२, रा. मुरगूड), प्रकाश पांडुरंग मांगले (वय ५७, रा. मुरगूड), रणजितसिंह सुरेशराव सूर्यवंशी (वय ५२, रा. निढोरी) आणि तन्मय दत्तात्रय बाचनकर (वय २७, रा. आदमापूर) यांचा समावेश आहे.
या घोटाळ्यामध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि नियमांना बगल देऊन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणे यांसारखे प्रकार उघडकीस आले आहेत. या संपूर्ण प्रकरणातील काही मुख्य सूत्रधार आणि तत्कालीन शासकीय अधिकारी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या धडक कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आणि राज्यभरातील बाळूमामा भक्तांमध्ये तीव्र संताप उसळला असून, या प्रकरणाच्या व्याप्तीमुळे आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




