शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री 2 वाजता तुम्ही एखाद्या पबमध्ये काही तास नाच-गाणे करून थकून घरी परतता. घरी पोहोचल्यावर तुम्हाला दिसते की मुख्य दरवाजा अजूनही उघडा आहे. आत शिरताना तुम्ही पुटपुटता - “बेजबाबदार! ’ पण ही खरी गोष्ट ही नसते. खरी गोष्ट ही की तुमच्या वडिलांनी हॉलच्या खिडकीतून तुम्हाला तुमच्या मित्राच्या बाईकवरून किंवा टॅक्सीतून उतरताना पाहिले होते. त्यांना रात्री 2 वाजता तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची नव्हती. पण संध्याकाळी 8 वाजता जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडला होतात, तेव्हापासूनच त्यांच्या नजरा दरवाजावर लागल्या होत्या. ते आपल्या लाडक्या मुलीच्या परतण्याची वाट पाहत होते. जेव्हा तुम्ही शेवटी सुखरूप घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो दिलाशाचा एक शांत सुस्कारा होता. त्यांनी देवाचे आभार मानले आणि झोपायला गेले. पण ते अजून झोपलेले नाहीत. कदाचित ते वाट पाहत आहेत की तुम्ही त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावाल आणि म्हणाल - “सॉरी डॅड, मला उशीर झाला.” पण याऐवजी तुम्ही तुमच्या खोलीचा दरवाजा बंद करता आणि रविवारच्या दुपारपर्यंत झोपून राहता. वडील सकाळी ६ वाजताच उठून शनिवार-रविवारची महत्त्वाची कामे उरकण्यात लागलेले असतात. अनेक कुटुंबांमध्ये शनिवार-रविवार काहीसे असेच जातात. मुलांना वाटते की आई-वडील त्यांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ करत आहेत. आई-वडिलांना वाटते की मुले त्यांची काळजी समजूनच घेत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये प्रेम, रागाच्या थरांखाली कुठेतरी दबून जाते. मला नुकतेच भोपाळमध्ये आयोजित एका इंडक्शन कार्यक्रमादरम्यान जाणवले की आई-वडील आणि मुलांमधील हे अंतर किती वाढलेय. मी तिथे मुलांना विचारले की ज्यांना असे वाटते की त्यांचे आई-वडील, विशेषतः वडिलांसोबत त्यांचे नाते दुरावले आहे, त्यांनी हात वर करावेत. मला अपेक्षा होती की काही हात वर येतील. पण शेकडो हात एकाच वेळी वर आले. ते दृश्य विसरणे कठीण होते. ही अशी मुले नव्हती, ज्यांनी आपल्या वडिलांवर प्रेम करणे बंद केले होते. ही मुले फक्त त्या वयात पोहोचली होती, जिथे आई-वडिलांचा प्रत्येक सल्ला त्यांना ढवळाढवळ वाटू लागतो. तर किशोरावस्थेतील स्वैराचाराचे प्रत्येक कृत्य आई-वडिलांना धोक्यासारखे दिसू लागते. 12 ते 1६ वर्ष वयोगटातील मुलांचे आपल्या आई-वडिलांशी भांडणे स्वाभाविक आहे. हा मोठे होण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यांना स्वातंत्र्य हवे असते, खासगीपणा हवा असतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार हवा असतो. तर आई-वडिलांनी अजूनही त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली असते. मी काही वह्यांमध्ये लिहिलेले पाहिले - “आय हेट माय फादर. ’ कदाचित त्या लहान मुलाने असा विचार केला नसेल की जर त्याच्या वडिलांनी नकळत हे शब्द वाचले तर त्यांच्यावर काय बेतेल. ज्या आई-वडिलांनी मुलांसाठी अनेक वर्षे आपल्या सुख-सुविधा, पैसा, झोप आणि अनेकदा आपल्या स्वप्नांनाही मागे ठेवले असेल, त्यांच्यासाठी असे शब्द एखाद्या घावापेक्षाही खोल जखम देऊ शकतात. ते कदाचित स्वतःलाच विचारतील की आपल्या मुलासाठी एवढे करूनही तो माझ्याबद्दल असाच विचार करतो का? म्हणूनच मुलांनी आपला राग व्यक्त करताना थोडे सावध राहिले पाहिजे. राग तात्पुरता असतो, पण लिहिलेले शब्द कायमस्वरूपी आठवण बनू शकतात. आई-वडिलांसोबत आपले नाते जपण्याच्या महत्त्वावर मुलांशी बोलताना मला हे सत्य पुन्हा एकदा दिसले. माझ्यासमोर ती मुले होती, जी आता आपले कॅम्पस जीवन सुरू करणार होती आणि स्वातंत्र्याच्या एका अगदी नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी तयार होती. पण त्यांच्या मागे ते आई-वडील उभे होते, ज्यांनी त्यांना इथपर्यंत पोहोचवले होते. बोलता-बोलता माझी नजर अशा किमान 50 जणांवर पडली, जे गुपचूप आपले अश्रू पुसत होते. अनेक वर्षे त्यांनी आपल्या मुलांचा हात धरून ठेवला होता. आता त्यांना त्यांचा हात सोडून देण्यास सांगितले जात होते. कदाचित त्या अश्रूंनी ते सर्व काही सांगून टाकले, जे मुलांना अजूनपर्यंत समजले नव्हते. फंडा असा आहे की, गरज पडल्यास आपल्या आई-वडिलांशी भांडून घ्या. त्यांच्याशी असहमती दर्शवा. आपले स्वातंत्र्यही मागा. पण जेव्हा राग उतरेल, तेव्हा परत जा आणि त्यांना सॉरी म्हणा. कारण रात्री 2 वाजता उघड्या दरवाजाच्या मागे तुमची वाट पाहणारे लोक तुमचे शत्रू नाहीत. ते तेच आहेत, जे तुम्ही सुखरूप घरी परतावे म्हणून प्रार्थना करतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




