एखाद्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये तुम्ही तुमच्या केबिनमध्ये बसलेले आहात आणि सेक्रेटरी तुमच्या मीटिंग्ज ठरवत आहे. अचानक एचआर हेड तुम्हाला मैदानावर बोलावतात आणि बूट-मोजे काढून बटाट्याच्या पोत्यात पाय घालून धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याची विनंती करतात. या स्पर्धेत तुम्हाला रिपोर्ट करणारे आणि दुसऱ्या विभागांतील असे तरुण कर्मचारीही असतात, ज्यांना लंचच्या वेळी तुमच्यासोबत कॅन्टीनमध्ये बसण्याची संधीही मिळत नसते. अशा वेळी तुम्हाला किती सहज वाटेल? किंवा कामाच्या मध्येच तुम्हाला एका तात्पुरत्या किचनमध्ये बोलावून एका मोठ्या कढईत पोटॅटो-रोस्ट बनवायला सांगितले जाते. तुम्ही लगेच शेफची कॅप आणि अॅप्रन घालून हे करू लागाल का? की उलटून विचाराल की, या ॲक्टिव्हिटीचा कंपनीच्या प्रॉडक्टिव्हिटीला कसा फायदा होईल? जर तुम्ही यापैकी कोणतेही काम करण्यास कचरत असाल किंवा आदेश न मानता त्यांना प्रश्न विचारत असाल, तर तुमची टीम-बिल्डिंग ॲबिलिटी अजून समाधानकारक पातळीवर पोहोचलेली नाही, असे मॅनेजमेंट मानू शकते. सहकाऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधताना वाटणारी धाकधूक संपवण्यासाठी, संपूर्ण स्टाफसाठी टीम-बिल्डिंग प्रोग्राम घेण्याचा विचार मॅनेजमेंट करू शकते. मला या टीम-बिल्डिंगचे महत्त्व तेव्हा समजले, जेव्हा मी जोडलेल्या एका ग्रुपमधील सदस्यांच्या वारंवार येणाऱ्या पोस्टकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. ‘गेम-स्टॉर्म फॅन क्लब’मध्ये एक पोस्ट होती की, ‘मी आज एका मोठ्या कॉर्पोरेटसोबत टीम-बिल्डिंग एक्सरसाइज केली.’ या ग्रुपमध्ये देशातील विविध राज्यांमधील 981 सदस्य आहेत आणि आसिफ इब्राहिम याचे प्रमुख आहेत. ते एचआर प्रोफेशनल्स आणि ट्रेनर्सना टीम-बिल्डिंगसाठी विविध प्रकारचे गेम्स आणि ॲक्टिव्हिटी शिकवतात. मी अनेकदा विचार करायचो की, टीम-बिल्डिंग एक्सरसाइजमध्ये हे लोक पोटॅटो-सॅक रनिंग आणि रोस्ट पोटॅटो स्पर्धेशिवाय नक्की करतात तरी काय. मग या रविवारी मी गॅलपचा एक नवीन सर्व्हे पाहिला. त्यात म्हटले होते की, कामाच्या ठिकाणी प्रत्येक वयाचे कर्मचारी स्वत:ला एकाकी समजू लागले आहेत. सर्वेक्षणात असे आढळून आले की, मोठे व्यवसाय आणि इतर संस्थांवरील त्यांचा विश्वास आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे. 1935 मध्ये स्थापन झालेली गॅलप ही एक जागतिक ॲनालिटिक्स आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. ती लोकांचे मत ट्रॅक करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा कुठे मला समजले की, हे ट्रेनर्स वर्षभर टीम-बिल्डिंग एक्सरसाइज घेण्यात एवढे व्यस्त का असतात. कधी कधी तर ते एकाच कंपनीसाठी वारंवार प्रोग्राम घेतात. कदाचित आजकालच्या कामाच्या ठिकाणी एकत्र खेळणे ही एक पद्धत बनत चालली आहे, ज्यामुळे लोक एकत्र काम करायला शिकू शकतील. विशेष म्हणजे या ॲक्टिव्हिटीज कंपनीच्या बोर्ड रूममध्ये होत नाहीत, तर त्या नैसर्गिक ठिकाणी, मुलांच्या पार्कमध्ये, म्युझियममध्ये आणि किड्स झोनमध्ये होत आहेत. अनेक कंपन्या रिट्रीटमध्ये अशा ट्रिप्स प्लॅन करत आहेत. इथे खेळले जाणारे गेम्स पाहून असे वाटते की, जणू ते एखाद्या 10 वर्षांच्या मुलाने डिझाइन केले आहेत. आणि मोठ्या लोकांनी अशा गमतीदार गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा केली जाते, ज्या आपल्यापैकी अनेकांनी त्या वयात केल्या होत्या, जेव्हा मित्र बनवणे सोपे वाटायचे. कल्पना करा की एक पिरॅमिड बनवला जात आहे, ज्यामध्ये 75 किलो वजनाचा बॉस खाली उभा आहे. आणि दोन महिन्यांपूर्वीच आलेला 48 किलोपेक्षा कमी वजनाचा नवीन कर्मचारी त्यांच्या पाठीवर चढून एक ड्रिंक घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे विचित्र वाटू शकते, पण या खेळाचा परिणाम म्हणजे नवीन कर्मचारी आणि 25 वर्षांपासून तिथे काम करणारे बॉस यांच्यात एक मजबूत बाँडिंग तयार होते. असे यासाठी होते कारण, वयस्कर कर्मचाऱ्याच्या तुलनेत कमी वजन असलेल्या तरुण कर्मचाऱ्यामध्ये एम्प्लॉयरच्या मूल्यांची काळजी घेण्याची प्रवृत्ती अधिक असते. एम्प्लॉयर्सना तरुण पिढीला कामाच्या ठिकाणाशी जोडण्याचा एक मार्ग समजला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत कंपन्यांनी आता कर्मचाऱ्यांच्या इच्छेला अधिक प्राधान्य देणे सुरू केले आहे. गोल्फ आणि क्रिकेटसारखे खेळ ती जवळीक आणू शकत नाहीत, जी मुलांचे खेळ आणू शकतात. खरे तर अशी ठिकाणे, ज्यांचे मुख्य ग्राहक मुले असतात, ती ठिकाणे आता कॉर्पोरेट ऑफ-साइट पर्याय म्हणून स्वतःचे मार्केटिंग करू लागली आहेत. हे एम्प्लॉयर्सच्या बदलत्या विचारांचे संकेत आहेत. फंडा असा आहे की, जर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या आतील मुलाला मेंटॉरिंग किंवा गेमिंगच्या माध्यमातून वर्क-टेबलवर घेऊन आलात तर ते अधिक प्रॉडक्टिव्ह बनू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

सायन-कोळीवाड्यात पुजाऱ्याचे अनोखे आंदोलन! कचऱ्याच्या समस्येकडे वेधले प्रशासनाचे लक्ष!
31 October 2026
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण संपन्न! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




