पुणे/बारामती: पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे एक अत्यंत मोठी कामगिरी बजावली आहे. पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे आंतरराज्यीय गांजा तस्करीचे मोठे जाळे पोलिसांनी उध्वस्त केले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत तब्बल ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७ मुख्य आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कारवाई आणि जप्त मुद्देमाल:
फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या या मोठ्या मोहिमेत पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ६३४ किलो गांजा, तस्करीसाठी वापरण्यात येणारी दोन चारचाकी वाहने आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी नुकत्याच केलेल्या ताज्या कारवाईत २३ किलो गांजा जप्त केला असून, संपूर्ण कारवाईतील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३.०४ कोटी रुपयांच्या घरात आहे.
छत्तीसगड ते पश्चिम महाराष्ट्र कनेक्शन:
पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेदोरे छत्तीसगड राज्याशी जोडलेले आहेत. आरोपी छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणावर गांजा चोरट्या मार्गाने आणत असत आणि त्याचे बारामती परिसरात गोडाऊन बनवून साठवणूक करायचे. तिथून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये गांजा विक्रीचे मोठे जाळे त्यांनी तयार केले होते.
नाट्यमय पाठलाग आणि अटक:
२० मे रोजी हे तस्कर पंढरपूर-फलटण मार्गे बारामतीकडे दोन गाड्यांमधून गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला असता, तस्करांची एक कार वेगाने तासगावच्या दिशेने पळाली. पोलिसांनी सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्या कारचा पाठलाग करून ती पकडली. त्या कारमधून १३४ किलो ग्रॅम वजनाचा आणि ३३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
तर पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने बारामती-फलटण रस्त्यावरील गवारफाटा येथे दुसरी कार अडवून झडती घेतली, ज्यामध्ये २३ किलो गांजा (किंमत ११ लाख ५५ हजार) सापडला. बारामतीचा मुख्य संशयित विकी कांबळे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने माल मागवून इतर जिल्ह्यांतील छोट्या विक्रेत्यांना पुरवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. प्रकाश काटे
२. समाधान गायकवाड
३. प्रिन्सकुमार सिंग
४. राहुल गोरे
५. विकी ऊर्फ पप्पू कांबळे
६. संग्राम सिंग
७. जॉकी माझी
शहर
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
- मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!
महाराष्ट्र
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- रत्नागिरी: काळाचा घाला! आई-वडिलांसोबत मासे पकडायला गेलेली एकाच कुटुंबातील ५ मुले खाडीत बुडाली
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!























Subscribe to my channel



