
Pune : पुणे शहरातील बुधवार पेठ इथं बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्याच्या माहितीवरून पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही धडक कारवाई करत अनेक कुंटणखान्यांची झडती घेण्यात आली. या कारवाईत दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली आणि काही अल्पवयीन मुलींनाही वाचवण्यात आले. मात्र, यावेळी अनेक ग्राहकांना रस्त्यावर बसवण्यात आलं होतं. या मुद्द्यावरून आता मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत एका व्यक्तीने थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुणे शहर पोलिसांनी आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा आणि विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही मोहीम राबवली. या व्यापक मोहिमेत बुधवार पेठेतील कुंटणखान्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ३ पोलिस उपायुक्त, ८ सहायक पोलिस आयुक्त, सुमारे ५५ निरीक्षक–उपनिरीक्षक आणि ६०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. त्यांनी ४१ इमारती तपासल्या आणि सुमारे ७०० जणांची झडती घेतली होती. या कारवाईदरम्यान अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रामेश्वर बिभीषण बिराजदार याला अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडण्यात आली, जेणेकरून कुंटणखाना चालकांना पूर्वकल्पना मिळू नये. यासाठी फरासखाना पोलिस ठाण्यालाही ऑपरेशन सुरू होईपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती, असं सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितलं.
पोलिसांनी बुधवार पेठेतील कारवाईदरम्यान ग्राहकांना रस्त्यावर सार्वजनिकरीत्या बसवून अपमानित केल्याचा गंभीर आरोप तुषार देविदास झेंडे पाटील यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली असून तक्रारीत म्हटलं आहे की, अनेक ग्राहकांना कोणताही गुन्हा नोंद नसताना तासंतास रस्त्यावर बसवण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी त्यांची ओळख उघड होईल अशी वागणूक देण्यात आली. हा मानवी हक्कांचा भंग असल्याचा दावा करत तक्रारदाराने आयोगाला या ऑपरेशनची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच, संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करत अपमानास्पद वागणूक मिळालेल्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




