राज्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आज राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपचे वर्चस्व पहायला मिळाले. अनेक ठिकाणी उमेदवारांनी बोटावर मोजण्याइतक्या मतांनी विजय मिळवला आहे. अशातच आता लातूरमधील एका निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. धाकट्या जाऊबाईने थोरल्या जाऊबाईचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे या निकालाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धाकली जाऊबाई ठरली सरस
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटात सख्या भावजया एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. काँग्रेस तिकीटावर आशाताई भिसे यांना उमेदवारी मिळाली होती, तर भाजपाकडून सरिता भिसे या रिंगणात उतरल्या होत्या. त्यामुळे या दोघींमधील लढत संपूर्ण जिल्हात चर्चेचा विषय बनली होती. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात काँग्रेसच्या उमेदवार धाकट्या जाऊ बाई आशाताई भिसे यांनी भाजपाच्या मोठ्या जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला आहे. या निकालात धाकली जाऊबाई सरस ठरल्याचे पहायला मिळाले आहे.
लातूरमध्ये महायुतीची सत्ता
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत 59 पैकी 18 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीला 12 आणि शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. या तिन्ही पक्षांनी मिळवून 31 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लातूरमध्ये काँग्रेसला 23 शिवसेना ठाकरे गटाला 1, शरद पवार गटाला 1 आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी या महाविकास आघाडीतील इतर पक्षांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
राज्यात महायुतीचा दणदणीत विजय
राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
शहर
- मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरील डिजिटल जाहिरात फलकांचा प्रखर प्रकाश ठरतोय जीवघेणा; रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न!
- मुंबई: संजय राऊतांचे तुकाराम मुंढेंना खळबळजनक पत्र; एफडीए अधिकाऱ्यांवर हॉटेल-व्यापाऱ्यांकडून वसुली आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- ठाणे: मुरबाड-माळशेज मार्गावर दोन पिकअप व्हॅनची समोरासमोर भीषण धडक; पिता-पुत्रासह तिघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा!
- सोलापुर: दुष्काळाची भीषण परिस्थिती! जनावरांच्या रक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर तब्बल १२० दिवस पूर्ण बंदी!
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
- नांदेड: "थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा..."; मुदखेड दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याप्रकरणी अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ!
गुन्हा
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




