जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. महापालिका निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. भाजपला या निवडणुकीत मोठं यश मिळालं असून, या निकालावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 2017 मध्ये देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भगामध्ये मारली होती. 2014 असेल 2019 असेल किंवा 2024 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभा निवडणुकांमध्ये अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता. पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे हे जे मिथक होतं, की भाजप हा शहरी किंवा नमशहरी पक्ष आहे, ते आम्ही 2014 मध्ये तोडलं होतं. ते 2017 मध्ये आम्ही अधोरेखित केलं, आणि आता मात्र आम्ही ते पूर्णपणे स्थापित केलं आहे, की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण भागत नंबर एकचा पक्ष आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हा जनतेचा विश्वास आहे, एकूणच या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे ग्राम विकासाचं कार्य हाती घेतलं. ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील सोई सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी विविध विकास योजनांमधून सकारात्मक वातावरण तयार केलं, आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं, त्यामुळे एक मोठा विश्वास जनतेच्या मनात तयार झाला. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप असेल किंवा आमचे मित्र पक्ष असतील त्यांना प्रचंड समर्थन मिळत आहे, आणि त्याचाच हा परिणाम आहे की, आम्ही एवढी मोठी भरारी घेतली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
भाजप हा या निवडणुकीत नंबर एकचा पक्ष ठरला आहे, जवळपास सात ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला दोन ठिकाणी यश मिळालं आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेनेला यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर एकवर आहे. आणि दोन ठिकाणी आम्ही तिनही पक्ष एकत्र लढलो होतो, कोल्हापूर आणि लातूरमध्ये तिथेही आम्हीच नंबर एकवर आहोत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




