बांगलादेशमध्ये अलिकडेच निवडणुका पार पडल्या. यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहुमत मिळवले आहे. आता 17 तारखेला बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या समारंभाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आहे. या सोहळ्यासाठी भारताकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना बांगलादेशला पाठवले जाणार आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओम बिर्ला बांगलादेशला जाणार
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा 17 फेब्रुवारी रोजी ढाका येथील राष्ट्रीय संसद भवनाच्या दक्षिण प्लाझा येथे पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते, मात्र याच काळात मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आणि दिल्लीत AI शिखर परिषदेच्या तयारीमुळे पंतप्रधान मोदी बांगलादेशला जाऊ शकणार नाहीत. त्यांचा जागी ओम बिर्ला बांगलादेशला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा दणदणीत विजय
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बांगलादेशच्या 13 व्या संसदीय निवडणुकीत दमदार विजय मिळवला आहे. तारिक रहमान आता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहोत. त्यांचे वडील झियाउर रहमान बीएनपीचे संस्थापक होते आणि त्यांची आई खालिदा झिया माजी पंतप्रधान होत्या. रहमान यांनी 2008 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देश सोडला होता. मात्र अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत रहमान यांनी दोन तृतीयांश बहुमत मिळवून इतिहास रचला. आता पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था आणि आर्थिक स्थिरता मजबूत करण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.
दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारणार
तारिक रहमान यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी फोनवरून रहमान यांचे अभिनंदन केले आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या सर्व बलिदानांची आठवण केली. त्यांच्या शपथविधीला जगभरातील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आता भारतही आपले प्रतिनिधी पाठवणार आहे. हे दोन्ही देशांमधील नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. बीएनपीने नेहमीच भारतासोबत संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




