छत्रपती संभाजीनगर: "तुमच्या नावाने सहा कोटी रुपयांची अवैध मार्गाने कमाई झालेली आहे. तुमच्या बँकेत दोन कोटी रुपये जमा आहेत. तुम्हाला अटक होईल", अशी भीती दाखवून एका ६९ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट प्रकरणात सायबर चोरांनी तब्बल १२ लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २ ते २० मे या काळात बेगमपुरा भागात घडला.
फिर्यादी अरुणा उदय माने (६९, रा. माने बंगला, विद्युत कॉलनी, बेगमपुरा) या गृहिणी असून, पतीच्या निधनानंतर त्या घरी असतात. दरम्यान, त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक कॉल आला आणि नंतर व्हिडिओ कॉल जोडण्यात आला. कॉल उचलताच समोरून "आयपीएस सुनील गौतम बोल रहा हूँ," असे सांगण्यात आले. तसेच तुमचे बँक खाते आयसीआयसीआय दिल्ली येथे असून तुमच्या नावाने सहा कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग, ड्रग्स व मानवी तस्करी झाली आहे, असे सांगत भीती निर्माण केली. तुमच्या खात्यावर दोन कोटी रुपये जमा झालेले असून तुम्हाला अटक करणार असल्याची धमकी देण्यात आली.
ऑनलाइन चौकशीही झाली सुरू:
सदर महिलेने घबराटीत तिच्या मुलीला बोलावून घेतले. त्यानंतर ३ मे रोजी दुपारी ५ वाजता सायबर भामट्यांनी महिला आणि तिच्या मुलीची ऑनलाइन चौकशी सुरू केली. "तुमच्या आजूबाजूला कोणी व्यक्ती अचानक श्रीमंत झाली आहे का? गेल्या वर्षात तुम्ही प्रवास कुठे कुठे केला?" असे प्रश्न विचारत त्यांना मानसिक दबावाखाली ठेवले.
भितीपोटी १२ लाख रुपये ट्रान्सफर झाल्यानंतर ही रक्कम २ जूनपर्यंत परत मिळेल, अशी थाप चोरांनी मारली. मात्र, २ जूनपर्यंत पैसे न आल्याने आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ६९ वर्षीय महिलेने एनसीसीआरपी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली. तसेच फसवणूक करणाऱ्या मोबाईलधारक क्रमांक (९५३२५००३०१) च्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना
- पालघरमधील पारेषण वाहिनीसाठी २१,०२२ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची मंजुरी; पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाला प्राधान्य
- नागपूर: आता 'बॉण्ड'मुक्त झाले एमबीबीएस पदवीधर; पुढील शिक्षण व सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो वैद्यकीय पदवीधरांना मोठा दिलासा
महाराष्ट्र
- दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे पुणे महापालिकेत तीव्र उमटसाद! विरोधकांचा काळ्या फिती लावून निषेध, तर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजीमुळे गोंधळ"
- सांगली: प्रलंबित बिल काढण्यासाठी ९५ हजार रुपयांची लाच घेताना गुंडेवाडीचे ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात;
- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



