पवना धरण ९५ टक्के भरले! ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, गरज भासल्यास विसर्ग ५ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा"

पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, पवना धरण तब्बल ९५ टक्क्यांहून अधिक भरले आहे. धरणाची पाणीपातळी सुरक्षित पातळीवर नियंत्रित राखण्यासाठी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सुरुवातीला विद्युत गृहद्वारे नदीपात्रात ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, परिसरातील पावसाचा जोर आणि येणारा नवीन पाणीसाठा (Inflow) पाहता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने ५,००० क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

घटना व प्रशासकीय सतर्कतेचा सविस्तर तपशील:

  • नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा: धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. यामुळे मावळ तालुका तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून अत्यंत Hihgh Alert (सतर्कतेचा इशारा) देण्यात आला आहे. नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठच्या लगतच्या भागात आपले साहित्य, शेतीची उपकरणे, कृषी पंप आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी तातडीने हलवण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

  • पाणीकपातीचे संकट दूर आणि वर्षभराची चिंता मिटली: यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने काहीशी ओढ दिल1्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता, ज्यामुळे प्रशासनाला पाणीकपात लागू करावी लागली होती. मात्र, आता धरण ९५ टक्क्यांवर पोहोचल्याने पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि वर्षभराच्या टेंन्शनचा प्रश्न मिटला असून मोठा दिलासा मिळाला आहे.

  • अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन: आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या खोट्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून तालुका आणि शहर प्रशासनाला सहकार्य करावे, असे विशेष निर्देश जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *