नवी मुंबई: कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचे उत्तम उदाहरण पेश करत रबाळे वाहतूक शाखेच्या दोन पोलीस शिपायांनी प्रसंगावधान दाखवून एका बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचवल्याची हृदयस्पर्शी घटना नवी मुंबईत घडली आहे. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
१७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास रबाळे वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई सचिन ढाले आणि सचिन सुळ हे दोघे आपले नियमित कर्तव्य संपवून घरी जात होते. त्यावेळी रबाळे येथील रिलायन्स उड्डाणपुलाच्या बेलापूर लेनवर एक कार दुभाजकाला (डिव्हायडर) आदळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने गाडीजवळ जाऊन पाहणी केली असता, कारचालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले.
गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही पोलिसांनी क्षणचाही विलंब न लावता चालकाला तातडीने सीपीआर (CPR) दिला. काही क्षणांतच चालकाला शुद्ध आली. त्यानंतर त्यांनी कोणतीही वेळ न घालवता चालकाला रबाळे येथील गवळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
चालकाची प्रकृती स्थिर
रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर चालकाने आपले नाव सचिन बिचुकले असून ते सानपाडा येथील मोराज रेसिडेन्सीमध्ये राहणारे असल्याचे सांगितले. ते लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीत नोकरीला असून ऑफिसवरून घरी जात असताना त्यांना हा त्रास झाला होता. उपचारादरम्यान त्यांच्या मोबाईलवर पत्नी अंजली बिचुकले यांचा फोन आला असता, पोलिसांनी त्यांना संपूर्ण घटना समजावून सांगितली आणि रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजले. "या पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर आज मी जिवंत नसतो," अशा शब्दांत सचिन बिचुकले यांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शहर
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"


























Subscribe to my channel


