मुंबई: ठाणे शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभळी नाका परिसरातील एका हॉटेल आणि लॉजमध्ये प्रियकराने आपल्याच प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आणि झालेल्या वादानंतर आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नंदकिशोर गाडेकर (वय २७, रा. विष्णू नगर, डोंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, संध्या म्हस्के (वय २३, रा. भांडुप पूर्व, मुंबई) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. मृत तरुणी ही भांडुप भागात राहत असून ती पतीपासून वेगळी राहत होती. मागील काही वर्षांपासून तिचे डोंबिवली येथे राहणाऱ्या विवाहित नंदकिशोर गाडेकर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मंगळवारी (दि. २१) दुपारी साधारण ५ वाजण्याच्या सुमारास हे दोघे ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील 'महाराजा हॉटेल लॉज' येथे आले आणि त्यांनी राहण्यासाठी एक रूम बुक केली होती.
रूममध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये आपापसात काही गोष्टींवरून वाद आणि खडाजंगी झाली. आरोपी तरुण हा मद्यधुंद किंवा संतापाच्या भरात होता आणि त्याला संध्या हिचे इतर कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. हा संशय आणि राग टोकाला गेल्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. मंगळवारी रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास आरोपी नंदकिशोर हा एकटाच रूममधून बाहेर पडला आणि लॉजच्या बाहेर निघून जाऊ लागला. त्यावेळी लॉजच्या मॅनेजरने आणि स्टाफने त्याला हटकले व तुमच्यासोबत आलेल्या मॅडम कुठे आहेत? अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने मॅडम वॉशरूममध्ये गेल्या आहेत, असे थातुरमातुर उत्तर दिले आणि तिथून पळ काढला. बऱ्याच वेळपर्यंत ती तरुणी बाहेर आली नाही आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीही उत्तर आले नाही.
यानंतर लॉज व्यवस्थापकांनी ड्युप्लिकेट चाबीने किंवा इतर मदतीने दरवाजा उघडून आत पाहिले, तेव्हा संध्या म्हस्के ही बेडवर संशयास्पद व मृतावस्थेत पडलेली आढळली. हा प्रकार उघडकीस येताच लॉज व्यवस्थापनाच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याला दिलीमाहिती मिळताच ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी (Post Mortem) ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. मृत तरुणीजवळ सापडलेल्या आधार कार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे तिची ओळख पटविण्यात आली. तसेच लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नंदकिशोर गाडेकर हा जांभळी नाका परिसरातच लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीला जेरबंद केले आणि ताब्यात घेतले. पोलीस चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या प्रेयसीचे इतर व्यक्तीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. लॉज व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. या भीषण घटनेमुळे ठाणे परिसरात मोठी सनसनाटी पसरली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




