मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली ठाण्यातील दिवा भागातील शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आला आहे. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली येथील भूमिपुत्रांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा सज्जड दम देत ठाणे महापालिकेच्या महासभेत याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
नेमके आरोप काय?
शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक व दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी महासभेत बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे स्थानिकांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. प्रशासन आणि नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडवर टीकास्त्र सोडताना त्यांनी अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकला:
भूसंपादनातील मनमानी: ठाणे जिल्ह्यातील भूमी आणि भूसंपादनाची सुनावणी ठाण्यात न घेता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे घेण्यात आली. यामुळे दिव्यातील शेतकऱ्यांना राज्यभर फिरवून मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आला.
अपुरा मोबदला: अनेक शेतकऱ्यांना अद्याप न्याय्य मोबदला मिळालेला नाही. काही ठिकाणी महिलांच्या नावावरील मालमत्ता पाडण्यात आल्या, मात्र त्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. एकाच मालकाच्या दोन घरांपैकी केवळ एकाच घराचा मोबदला देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
पर्यावरणीय आणि पूरपरिस्थितीचा धोका: बेतवडे गावाकडे जाणारा मूळ रस्ता बंद करून नागरिकांसाठी अत्यंत अरुंद मार्ग ठेवण्यात आला आहे. भविष्यात २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास या भागाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. तसेच नैसर्गिक जलमार्ग बुजविणे आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला.
या मुद्द्यांवर शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी मढवी, अर्चना पाटील आणि दर्शना म्हात्रे यांनीही आवाज उठवत प्रकल्पातील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे महापालिका, बुलेट ट्रेन प्राधिकरण आणि शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक तातडीने बोलावून भूसंपादन, नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहर
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
- नवी मुंबई: ड्युटी संपली, तरी माणुसकीचे कर्तव्य निभावले! वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे बेशुद्ध कारचालकाचे वाचले प्राण
- टेमघर धरण ५० टक्के भरले! मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ, पुणेकरांच्या महिनाभराच्या पाण्याची तहान भागणार"
- पैठणच्या पाचोडमध्ये खळबळ! डाळिंब चोरीच्या संशयावरून तरुणाला अमानुष मारहाण; ९ जणांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल"
महाराष्ट्र
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
- गोवा: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग सुकर; प्रक्रिया वेगवान करण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी मंजूर
- भंडारा: खाकी वर्दीतील ४७ हजार होमगार्ड जवानांचे भवितव्य अंधारात; सेवेत कायम होण्याचे स्वप्न अपूर्णच, शासन दरबारी प्रतीक्षा कायम
- नवी मुंबई: ड्युटी संपली, तरी माणुसकीचे कर्तव्य निभावले! वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे बेशुद्ध कारचालकाचे वाचले प्राण
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"
- "दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन: पोलिसांच्या लाठीमारात नागपूरचा तरुण भारत बानाईत गंभीर जखमी; 'त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके होती', म्हणत कुटुंबीयांचा संताप"
- ग्राहक: न्यायालयाने धू-धू-धुतले, ९० ग्रॅमचे सर्फ एक्सलचे पाकीट निघाले ७० ग्रॅमचे; हिंदुस्थान युनिलिव्हरला ५० हजारांचा दंड



























Subscribe to my channel



