पुणे: पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील दगडोबा चौक भागात एका निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे शेजारच्या दोन मजली इमारतीला मोठा वेढा दिला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांची सुटका करत मोठी दुर्घटना टळली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी वाल्हेकरवाडी येथील एका दोन मजली निवासी इमारतीच्या खालील भागात (पार्किंगमध्ये) इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान अचानक एका ई-बाईकच्या बॅटरीमध्ये बिघाड होऊन किंवा शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने इतर दुचाकींनाही आपल्या चपेट्यात घेतले. पार्किंगमधील तीन इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यानंतर आगीच्या प्रचंड ज्वाला आणि धूर थेट वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले.
या अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन महिला आतमध्येच अडकून पडल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने आणि जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक जवानांचे धाडस आणि बचावकार्य
उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी तातडीने सूत्रे हलवत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. शर्थीचे प्रयत्न करत जवानांनी इमारतीत अडकलेल्या दोन्ही महिलांना अत्यंत सुरक्षित बाहेर काढले. जवानांच्या तत्परतेमुळे आणि धैर्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, निवासी इमारतींमध्ये किंवा पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग करताना नागरिकांनी योग्य त्या सुरक्षा उपायांचे पालन करावे, असे आवाहन अग्निशमन विभातर्फे करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




