मुंबई: कल्याणमधील मलंग रोडवर असलेल्या नीलकंठ सोसायटीत घडलेल्या या हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. प्रियकराची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्यानंतर, आरोपी महिलेने अत्यंत थंड डोक्याने त्याचा मृतदेह एका पोत्यात भरला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने तब्बल २४ तास बाथरूमचा नळ सुरूच ठेवला, जेणेकरून मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडावा आणि रक्ताचे डागही वाहून जावेत. हा क्रूर 'वॉटर प्लॅन' आखून महिला थेट कोलकात्याच्या दिशेने फरार झाली. मात्र, पळून गेल्यानंतर तिने घरमालकाला पाठवलेल्या एका व्हॉईसमेलमुळे या संपूर्ण थराराचा पर्दाफाश झाला.
व्हॉईसमेल ऐकला अन् घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली!
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नीलकंठ सोसायटीतील या बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यातच फरार झालेल्या आरोपी महिलेचा घरमालकाला तो धक्कादायक व्हॉईसमेल आला. मेसेज ऐकताच हादरलेल्या घरमालकाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मानपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बाथरूमच्या दिशेने गेल्यावर पोलिसांना एक संशयास्पद गोणी आढळून आली, ज्यात मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत होता.
फॉरेन्सिक पथक दाखल; पोलिसांची पथके कोलकात्याकडे रवाना
मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. व्हॉईसमेलच्या महत्त्वाच्या धाग्यावरून पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून 'मोस्ट वाँटेड' आरोपी महिलेच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके थेट कोलकात्याकडे रवाना झाली आहेत. हत्येमागील नेमके कारण काय होते आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सध्या पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: नऊ ठिकाणी रेल्वे पूल आणि भुयारी मार्ग उभारणार; 'महारेल'च्या माध्यमातून वाहतूक कोंडी सुटणार
- यवतमाळ: सरकारी व अनुदानित वसतिगृहात मोठा गैरव्यवहार उघड; कॅगने ओढले कडक ताशेरे, राज्यव्यापी चौकशीचे संकेत
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- पुणे: आईविषयी सर्वांसमक्ष केले आक्षेपार्ह वक्तव्य; अपमान सहन न झाल्याने नैराश्यात आलेल्या तरुण मुलाचे टोकाचे पाऊल
महाराष्ट्र
- पुणे:खाकीच्या नावाखाली १ कोटींच्या लूटचा प्रयत्न फसला, विश्वासातील कार चालकानेच मित्रांसह रचला होता भयानक कट, ३ जण जेरबंद
- पुणे: नऊ ठिकाणी रेल्वे पूल आणि भुयारी मार्ग उभारणार; 'महारेल'च्या माध्यमातून वाहतूक कोंडी सुटणार
- कोल्हापुर: हत्तीचा भयंकर प्रकोप, आजरा तालुक्यातील घटकारवाडी आणि किटवाड भागात हत्तीनेडले पिकांचे अतोनात नुकसान; शेतकरी चिंतेत
- यवतमाळ: सरकारी व अनुदानित वसतिगृहात मोठा गैरव्यवहार उघड; कॅगने ओढले कडक ताशेरे, राज्यव्यापी चौकशीचे संकेत
गुन्हा
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- रत्नागिरी: रत्नागिरीत सायबर गुन्हेगाराचा एकाच बँक खात्यावरून देशभरातील ५२ जणांना आर्थिक गंडा, गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"


























Subscribe to my channel



