
NPCI UPI Alert : तुम्ही देखील यूपीआय पेमेंट पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI युजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सरकारने म्हटलं आहे की, युजर्सच्या निष्काळजीपणामुळे तुमचं UPI खातं आणि UPI आयडी बंद होऊ शकतो. यूपीआय नेटवर्क चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने, गुगत पे पेटीएम आणि फोन पे सारख्या थर्ड पार्टी यूपीआय अॅप्सना काही यूपीआय आयडी आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं आहे.
यूपीआय युजर्ससाठी महत्त्वाची बातमी
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने जारी केलेल्या नोटिसमध्ये सांगितलं आहे की, वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळ कोणताही व्यवहार न झालेली खाती बंद करण्यात येणार आहेत. NPCI ने UPI नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वापरात असलेला यूपीआय क्रमांक आणि यूपीआय आयडी सक्रिय राहतील.
31 डिसेंबरपर्यंत मुदत
NPCI ने निष्क्रिय UPI क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे, जर युजर्सला त्याचा UPI आयडी आणि नंबर नेटवर्क बंद करायचं नसेल, तर त्याला त्याचा UPI सक्रिय ठेवावा लागेल. UPI आयडी आणि नंबर नेटवर्क काढताना किंवा बंद करताना, बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना ईमेल आणि मेसेजद्वारे युजर्सना माहिती द्यावी लागेल.
एनपीसीआयने सांगितलं आहे की, 'डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी सुरक्षित व्यवहाराचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी बँकिंग प्रणाली नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. काही युजर्स नव्याने अकाऊंट लिंक करुन मोबाइल नंबरला बदलतो पण त्या नंबरवरून यूपीआई खाते बंद करत नाही.'
11 अब्ज UPI व्यवहार
एनपीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत यूपीआयच्या माध्यमातून 11 अब्जहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत यूपीआय व्यवहार जवळपास एक अब्जने वाढले आहेत.दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक त्यांचे मोबाईल नंबर बदलतात. त्यावेळी, सिस्टममधून जुना क्रमांक काढला जात नाही. ट्रायच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन युजरला जुना क्रमांक जारी केला जाऊ शकतो. यामुळे, सर्व बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जात नाहीत, असे सर्व निष्क्रिय UPI आयडी आणि नंबर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
महाराष्ट्र
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहारप्रकरणी मोठा खुलासा; एसआयटीकडून सहावा एजंट सागर पाटील अटकेत!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel




