पुणे: बँकेत भरण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या एका स्टेशनरी व्यावसायिकाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार पुणे-सातारा रस्त्यावर घडला आहे. नेहमी विश्वासाने भाड्याने घेतल्या जाणाऱ्या कारच्या चालकानेच पैशांचा सुगावा लागताच आपल्या साथीदारांसह हा दरोड्याचा कट रचला होता. 'आम्ही पोलीस आहोत' अशी बतावणी करत फिल्मी स्टाईलने ही रक्कम लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नऱ्हे पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील तिघांना अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार सध्या फरार आहेत.
विक्रम विलास चाकणकर (वय ४४), अमेय अरविंद कार्ले (वय ४६) आणि गणेश रमेश कदम (वय ३३, तिघेही रा. धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. हा सर्व थरार १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १ ते २ च्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील ब्रम्हा हॉटेल ते खेड शिवापूर पोलीस चौकी दरम्यान घडला.
फिर्यादी हर्षवर्धन पवार यांचा स्टेशनरीचा मोठा व्यवसाय असून ते संपूर्ण पुणे शहरात माल पुरवठा करतात. व्यवसायातून जमा झालेली १ कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेत भरून ती त्यांच्या ट्रस्टच्या खात्यावर ट्रान्सफर करायची होती. यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे ओळखीची एक खासगी सॅन्ट्रो कार भाड्याने घेतली. पवार आणि त्यांचे सहकारी किरण आपटे हे नोटांनी भरलेल्या दोन बॅगा घेऊन कारमध्ये बसले. नेहमी विश्वासातील असलेला विक्रम चाकणकर हाच गाडी चालवत होता. मात्र, गाडीत १ कोटी रुपये असल्याची कुणकुण चालकाला लागली होती आणि त्याने आधीच आपल्या साथीदारांसह लुटीचा प्लॅन तयार केला होता.
गाडी नऱ्हे येथील एचडीएफसी बँकेच्या दिशेने जात असताना, वाटेत अचानक दोन मोटारसायकलवरून चौघे जण आले. त्यांनी कार अडवली. संशयित आरोपी अमेय कार्ले हा पवार यांच्या खिडकीजवळ आला आणि त्याने दमदाटी सुरू केली.
"आम्ही पोलीस आहोत, तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात हे आम्हाला माहित आहे. एवढी रक्कम घेऊन कुठे चालला आहात? गाडी बाजूला घ्या!" अशी धमकी त्याने दिली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे पवार आणि आपटे प्रचंड घाबरले. याच गोंधळाचा फायदा घेऊन अमेय कार्ले आणि गणेश कदम यांनी कारचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि पैशांच्या बॅगा खेचण्याचा प्रयत्न सुरू केला.
झटापट सुरू असतानाच, पूर्वनियोजित कटानुसार चालक विक्रम चाकणकर याने गाडी थांबवण्याऐवजी थेट सातारा रोडच्या दिशेने पळवली. गाडीतच आरोपी आणि फिर्यादी यांच्यात जोरदार वाद आणि बोलाचाली झाली. या गोंधळातच विक्रमने कार थेट 'खेड शिवापूर पोलीस चौकी'त नेली, जेणेकरून हा खरोखरचा पोलीस तपास असल्याचा आव आणता येईल.
परंतु, खेड शिवापूर पोलिसांनी जेव्हा गाडीतील सर्वांची सखोल चौकशी केली, तेव्हा पोलिसांना संशय आला. प्राथमिक चौकशीत हा प्रकार नर्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्यावर खेड शिवापूर पोलिसांनी तात्काळ नर्हे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले.
नऱ्हे पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा...
नऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांच्या खाकीचा इंगा दाखवताच चालक विक्रम चाकणकर आणि त्याच्या साथीदारांनी गुन्ह्याची कबुली दिली. स्वतः चालकानेच संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या ४ साथीदारांना बोलावून हा दरोड्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील फरार असलेल्या इतर दोन साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करत आहेत.
शहर
- यवतमाळ: सरकारी व अनुदानित वसतिगृहात मोठा गैरव्यवहार उघड; कॅगने ओढले कडक ताशेरे, राज्यव्यापी चौकशीचे संकेत
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- पुणे: आईविषयी सर्वांसमक्ष केले आक्षेपार्ह वक्तव्य; अपमान सहन न झाल्याने नैराश्यात आलेल्या तरुण मुलाचे टोकाचे पाऊल
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- कोल्हापुर: हत्तीचा भयंकर प्रकोप, आजरा तालुक्यातील घटकारवाडी आणि किटवाड भागात हत्तीनेडले पिकांचे अतोनात नुकसान; शेतकरी चिंतेत
- यवतमाळ: सरकारी व अनुदानित वसतिगृहात मोठा गैरव्यवहार उघड; कॅगने ओढले कडक ताशेरे, राज्यव्यापी चौकशीचे संकेत
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- पुणे: आईविषयी सर्वांसमक्ष केले आक्षेपार्ह वक्तव्य; अपमान सहन न झाल्याने नैराश्यात आलेल्या तरुण मुलाचे टोकाचे पाऊल
गुन्हा
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- रत्नागिरी: रत्नागिरीत सायबर गुन्हेगाराचा एकाच बँक खात्यावरून देशभरातील ५२ जणांना आर्थिक गंडा, गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel



