पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मायेमधून निर्मित भ्रम खऱ्या‎ भक्ताला कधी त्रास देत नाही

श्रीरामांनी काकभुशुंडींना सांगितले होते- "माया संभव भ्रम सब अब न‎ब्यापिहहिं तोहि.’ म्हणजेच, मायामुळे निर्माण झालेला कोणताही भ्रम‎आता तुला सतावणार नाही. मानवी जीवनावर माया हावी होते. तेव्हा‎माणूस भ्रमात पडतो. सुख-दुःख नेमके किती खरे आणि किती खोटे,‎हेच त्याला समजेनासे होते. मायेला सोप्या भाषेत ‘जादू'' म्हणतात ‎आणि इंग्रजीत ‘इल्यूजन'' म्हणतात. आपण जादूगाराचा खेळ पाहायला‎जातो. तेव्हा प्रत्येक खेळ खरा वाटतो. पण तसे काहीच नसते. हीच तर‎माया आहे. परमात्म्याला ‘मायापती'' म्हणतात. कारण ईश्वर हा मोठा‎जादूगर आहे. खऱ्या भक्ताला ईश्वराची ही माया सतावत नाही. त्यामागे‎कारण आहे. ईश्वर या मायेच्या माध्यमातूनच जगाची निर्मिती करतो. या‎शक्तीचे काम म्हणजे माणसाला ‘तू एक आत्मा आहेस, शरीरात‎आहेस, अशी जाणीव करून देणे. म्हणूनच श्रीराम सांगत आहेत की,‎माझी माया तुला सतावणार नाही आणि तू मोह अन् अज्ञानातून बाहेर‎पडशील. तू जगात राहशील, पण हे जग तुझ्या मनात नसेल . हाच खरा‎आनंद आहे!

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *