ओमान: किनाऱ्याजवळ इराणी सैन्याने इशारा देणारा गोळीबार केलेल्या व्यापारी जहाजावरील हल्ल्याचा भारताने रविवारी तीव्र निषेध केला. जहाजावर ११ भारतीय खलाशी होते, ज्यांपैकी १० जणांना वाचवण्यात आलं असून एक जण अद्याप बेपत्ता असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी:-
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, 'आज पहाटे ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावरील ११ भारतीय नागरिकांपैकी १० जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे, तर १ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे.' मस्कतमधील भारतीय दूतावास शोध आणि बचावकार्यासाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याचेही मंत्रालयाने पुढे स्पष्ट केले.
'ओमानमधील आमचे दूतावास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि सुरू असलेल्या शोध व बचाव मोहिमेत ओमानच्या अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे. आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो', असं मंत्रालयाने सांगितले. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली आणि कर्मचाऱ्यांना जहाज सोडण्यास भाग पाडले. या मालवाहू जहाजावरील हल्ल्याचा हवाला देत युनायटेड स्टेट्सने इराणवर लष्करी हल्ल्यांची नवीन फेरी सुरू केली.
अमेरिकेने या आठवड्यात इराणी लक्ष्यांवर केलेला हा तिसरा मोठा हल्ला होता. यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) च्या मते, अमेरिकेच्या ताज्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अंदाजे १४० लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन साइट्स, नौदलाची क्षमता, दारूगोळा साठवण, दळणवळण नेटवर्क आणि किनारपट्टीवरील पाळत ठेवण्याच्या ठिकाणांचा समावेश होता. चालू आठवड्यात सलग तीन रात्री झालेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिकन सैन्याने ३०० हून अधिक तळांवर मारा केल्याचं लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रत्युत्तरादाखल इराणने बहरीन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानसह संपूर्ण मध्य पूर्वेतील देशांवर हल्ले केले. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेले युद्ध कायमचे संपवण्यासाठी तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा आता मुख्य विषय ठरला आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




