वारंवार अत्याचार आणि नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी; शिंदे गटाच्या नेत्याकडून विवाहितेचा छळ, नवी मुंबईत गुन्हा दाखल!
नवी मुंबई: राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईमध्ये एका २६ वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आणि तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी नगरसेवक साहिल चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी साहिल चौगुले यांनी या महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर किंवा इतरत्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात येत होते, असा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे. या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून अखेर महिला पोलिसांकडे पोहोचली.
राजकीय वर्तुळात खळबळ नुकतेच मुंबईतील कुलाबा येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी युसूफ रंगवाला यांच्यावर एका महिला कार्यकर्त्याचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. ती घटना ताजी असतानाच, आता नवी मुंबईत सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाशी संबंधित असलेल्या साहिल चौगुले यांच्यावर थेट एका विवाहितेवर अत्याचार आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेमुळे सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली आहे.
पोलिसांचा तपास सुरू पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नवी मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी साहिल चौगुले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, पीडितेचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. या हाय-प्रोफाइल गुन्ह्यामुळे पोलीस प्रशासनावरही निष्पक्ष तपासाचे दडपण असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
शहर
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
महाराष्ट्र
- बीड: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! वडिलांच्या रागवण्यामुळे घर सोडलेल्या १० वर्षीय मुलीचा १४ तासांत शोध, १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत केली सुखरूप सुटका
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




