तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.

तेलंगणा:  रंगारेड्डी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीने सूडाच्या भावनेतून आपल्याच कुटुंबासह तक्रारदार कुटुंबातील सदस्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेत एकूण ६ जणांचा बळी गेला आहे.

नेमकी घटना: आरोपी बी. राजकुमार याच्यावर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मे महिन्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून, शुक्रवारी रात्री राजकुमारने थरारक हत्याकांड घडवून आणले. त्याने आधी त्याच्या पत्नीची (सरिता) आणि दोन लहान मुलांची (वय ४ आणि १.५ वर्षे) चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर, ज्या पीडित मुलीच्या कुटुंबाने त्याच्यावर तक्रार केली होती, त्या घरी जाऊन पीडित मुलगी, तिची आई आणि आजी अशा तिघांचीही अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

 

हत्येनंतर आरोपी पसार: या दोन घटना सुमारे ६ किलोमीटर अंतरावर घडल्या. रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान त्याने ही दोन्ही कृत्ये केली. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आपल्या वडिलांना फोन करून "मी सहा जणांना मारले आहे," अशी कबुली दिली आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून
फरार झाला. वडिलांनी तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

पोलिसांची भूमिका: पोलीस आयुक्तांनी दोन्ही घटनास्थळांची पाहणी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येसाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *