ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 17th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
आज एखाद्या प्रकल्पातून तुम्हाला सरकारी लाभ होईल. ऑफिसमधील महत्त्वाच्या कामाबाबत वरिष्ठांशी चर्चा होईल. तसेच ऑफिसच्या कामानिमित्ताने बाहेर जाण्याचा योग आहे. तुमचा कार्यभार वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद घडेल. घरातील सजावटीकडे जातीने लक्ष द्याल. शिवशंकराची तुमच्यावर अखंड कृपा राहील. जीवनसाथीसोबतचे मतभेद दूर होतील. प्रेम जीवन आनंददायी होईल.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
विदेशातील मित्राच्या ख्याली खुशालीची माहिती मिळेल. ज्या लोकांना परदेशात जायचं आहे, त्यांनी तयारी सुरू करा. तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आहे. त्याशिवाय धार्मिक स्थळी जाण्याचाही योग आहे. ऑफिसमधील कामाचा व्याप वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही चिडचिडे व्हाल. पण रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. दुपारनंतर मानसिक स्थितीत बदल होईल. तुम्ही सकारात्मक विचार कराल.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
आज तुमचा स्वभाव तापट होईल. चुकीचे विचार मनात येऊ शकतात. त्यामुळे विचारावर नियंत्रण ठेवा. तसेच आर्थिक खर्च वाढल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. ऑफिसमधील व्यक्तींशी मतभेद होतील. आजारी व्यक्तीने नवीन उपचार पद्धतीचा विचार करावा. मात्र, डॉक्टरांच्या सांगण्यानुसारच कोणतंही पाऊल उचला. मोठी गुंतवणूक करत असाल तर सावध व्हा. थोडी माहिती करूनच पुढील निर्णय घ्या. मात्र, गुंतवणुकीसाठी आजचा दिवस बरा दिसत नाही.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात व्यस्त राहाल. कपडालत्ता, सोनंचांदी खरेदी कराल. सिनेमा, नाटक पाहण्यात रमून जाल. आजचा दिवस म्हणजे फुल्ल एन्जॉयचा आहे. सुखाचा अनुभव घ्याल. दाम्पत्यजीवनात प्रेमाची अनुभूती येईल. भागिदारीतील व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं मन उत्साहाने भरलेलं असेल. बाहेर जाण्याचा योग आहे. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. घरी पै पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
आज तुम्ही खिन्नता अनुभवाल. भय आणि उदासीनतेने पछाडले जाल. घरात सुखशांती लाभेल. दिनचर्या व्यस्त असेल. परिश्रम करण्यात तुमचा हात कोणीही पकडणार नाही. वरिष्ठांसोबत वाद घालू नका. ऑफिसमधील टार्गेट पूर्ण करण्यात अडचणी येतील. व्यापार वाढवण्यासाठी कोणत्याही योजनेवर आताच निर्णय घेऊ नका. तुम्हाला धैर्याने दिवस काढावा लागेल. आरोग्य उत्तम राहिल. पण खाण्यापिण्याची आबाळ होईल.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
पोटाची समस्या जाणवेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. अचानक मोठा खर्चा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परफॉर्मन्स अत्यंत स्लो होईल. वेळेवर कामावर न आल्याने अडचणीचा सामना करावा लागेल. बॉसला हलक्यात घेऊ नका. नाहीतर अडचणी वाढतील. आज तुम्ही बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घ्या.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
आज तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. सातत्याने विचार करत असल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडेल. घरातील स्त्रियांची काळजी वाटेल. आज प्रवास करणं टाळा. ते तुमच्या हिताचं असेल. जेवण आणि झोप वेळेत न मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या प्रकरणात सावध पावलं उचला. सरकारी कामात निष्काळजीपणा करू नका. व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
आजचा संपूर्ण दिवस प्रसन्न जाईल. एखाद्या नव्या कामाची सुरुवात कराल. वरिष्ठांसोबत महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व येईल. ऑफिसमध्ये तुम्ही नवीन गोष्टी सुरू करू शकता. तुमच्या कामाचं कौतुक होईल. सहकाऱ्यांशी सुसंवाद राहील. आप्तेष्ठांच्या भेटीगाठी होतील. कोणत्याही कामात आज तुम्हाला यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळवणार. आज एक छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्ती महत्त्व देत नसल्याने अडचण वाढेल. आज तुमचं मनोबल दृढ नसल्याने तुम्हाला निर्णय घेताना अडचणी येतील. नोकरी करणाऱ्यांनी कामावर अधिक फोकस ठेवला पाहिजे. व्यवसायात आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. चुकीच्या ठिकाणी खर्च होईल. तसेच अत्याधिक कामामुळे मन बैचेन होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस भक्तीमय राहील. दिवसभर पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यात गुंतवून घ्याल. सर्व कामे व्यवस्थित मार्गी लावाल. मित्र आणि हितचिंतकांकडून आज भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. वैवाहिक जीवन सुखी राहिल. जुने वादविवाद दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. उधारी देऊ नका. नाही तर पैसे बुडतील.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
आज तुम्ही कुणाची बाजू घेऊ नका. नाही तर तुमच्यावर पक्षपातीपणाचा आरोप होईल. कुणासोबतही पैशाची उसनवारी करू नका. खर्च वाढू शकतो. स्वकीयांची नाराजी कायम राहील. कुणाचं तरी भलं करायला जाल तर तुम्हीच संकटात सापडण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. प्रेम जीवनात सकारात्मक बदल होतील. प्रिय व्यक्तीकडून मदत मिळेल.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
आज एखाद्या मोठ्या कार्यक्रमात भाग घ्याल. मित्र आणि आप्तेष्टांना भेटून आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळेल. पत्नी आणि मुलांकडून लाभ होईल. अचानक आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस खरीददारी करण्यासाठी उत्तम आहे. गुंतवणूक करण्याची घाई करू नका. प्रेमीयुगुलांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. लग्नाळूंना आज स्थळ सांगून येईल. लग्नाची तयारी करा, यंदा तुमचं लग्न होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




