पुणे: मोशीत पत्नीने प्रेमाने बनवली होती बिर्याणी, पण मित्राच्या आग्रहापायी पतीचा ढिगाऱ्याखाली अंत

पुणे: घरी पत्नीने आवडीची बिर्याणी बनवली होती. काम आटोपून जेवायला घरी जाण्याची तयारीही झाली होती. मात्र, 'आज माझ्यासोबतच जेव' असा मित्राचा आग्रह आला आणि सनी अशोक माने (वय ३६) जेवण्यासाठी थांबला. काही क्षणांतच कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि नियतीने त्याला कायमचे हिरावून नेले.

मोशी येथील कचरा डेपो परिसरात वाहनचालक म्हणून काम करणारा सनी माने हा मूळचा दिघी येथील रहिवासी होता. सनीच्या पश्चात पत्नी कांचन, दोन लहान मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. सनी हा कुटुंबाचा मुख्य आधार होता, त्याच्या अचानक जाण्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

दुर्घटनेच्या दिवशी सनीने घरी जेवायला जाण्याचे ठरवले होते. पत्नीने त्याच्यासाठी विशेष बिर्याणी बनवली होती. मात्र, मित्राच्या आग्रहामुळे तो कँटीनमध्ये थांबला आणि हाच निर्णय त्याच्या आयुष्याचा शेवटचा ठरला. या भीषण अपघातात सनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला. "तो जर घरी आला असता, तर आज आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते," असे म्हणत पत्नी कांचन यांना अश्रू अनावर झाले होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट:
या भीषण दुर्घटनेच्या चार दिवसांनंतर शनिवारी (११ जुलै) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बचावकार्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफची मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याच वेळी काही नातेवाइकांनी संताप व्यक्त करत दगडफेकीचाही प्रयत्न केला.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *