सिंधुदुर्ग: श्रीराम मंदिर दानपेटी प्रकरणी दोडामार्गात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; काँग्रेसकडून निषेध

सिंधुदुर्ग: प्रतिनिधी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा टाकणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींच्या निषेधार्थ तसेच संबंधितांना सुबुद्धी मिळावी या हेतूने दोडामार्ग येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समाजात शांतता, सद्भावना आणि धार्मिक स्थळांविषयी आदराची भावना कायम राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडण्यात आली.
सत्याग्रहात सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, संतोषकुमार दळवी, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, सुभाष दळवी, सुधीर चांदेलकर, सुधीर गवस, श्रीकृष्ण गवस, संदीप नाईक, सोनू गवस, मोहन गवस, बाबाजी सावंत, सुशांत बोंद्रे, दिनानाथ उगवेकर, मदन सावंत, तुकाराम नाईक, विजय हेरेकर, देवानंद हजारे, राजन गावडे, विठ्ठल नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या दोडामार्ग दौऱ्यादरम्यान पक्ष संघटन, स्थानिक प्रश्न तसेच आगामी राजकीय घडामोडींवरही चर्चा करण्यात आली.

 



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *