हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत 'हाय ब्लड प्रेशर' किंवा उच्च रक्तदाबाची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे. आकडेवारीनुसार, ३० ते ७९ वयोगटातील कोट्यवधी लोक या समस्येने त्रस्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी जवळपास ४६ टक्के लोकांना आपण हाय ब्लड प्रेशरचे बळी ठरलो आहोत, याची जाणीवच नसते. म्हणूनच उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' असे म्हटले जाते. हे आजार अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता शरीराला आतून पोखरत राहतात, ज्यामुळे भविष्यात हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या मते, शरीर काही विशिष्ट संकेत देत असते, जे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला खालील ५ लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

१. वारंवार डोकेदुखी: सकाळी उठल्यावर सतत होणारी डोकेदुखी हे उच्च रक्तदाबाचे एक मुख्य लक्षण असू शकते. काहींना डोक्यावर दाब आल्यासारखे वाटते, तर काहींना डोक्यात ठणक लागते.

२. छातीत दुखणे: उच्च रक्तदाबामुळे छातीत वेदना होणे, छातीवर वजन आल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. हे लक्षण हृदयविकाराच्या गंभीर धोक्याकडेही निर्देश करते.

३. चक्कर येणे: वारंवार चक्कर येणे किंवा तोल जाणे, विशेषतः उभे राहताना असे वाटणे, हे मेंदूकडे होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षण असू शकते.

४. मळमळ होणे: केवळ पोटाच्या तक्रारींमुळेच मळमळते असे नाही. रक्तदाब अचानक वाढल्यास मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

५. धूसर दिसणे: रक्तदाब वाढल्यामुळे डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे दृष्टी धूसर होणे, डोळ्यांसमोर ठिपके दिसणे किंवा दुहेरी दिसणे (Double Vision) असे त्रास होऊ शकतात.

टीप: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. स्वतःहून औषधे घेऊ नका.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *