पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.

पश्चिम बंगाल: बारुईपूर येथे एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी प्रभाष मंडल याचा बुधवारी पहाटे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला.

घटनेचा तपशील:
पोलिसांनी या गुन्ह्याचे 'सीन रिक्रिएशन' (घटनास्थळाचे पुनर्निर्मिती) करण्यासाठी आरोपी प्रभाष मंडलला घटनास्थळी नेले होते. मध्यरात्री पोलीस पथक त्याला घेऊन गेले असता, आरोपीने अचानक एका पोलीस कर्मचाऱ्याचे शस्त्र हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात आरोपी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारुईपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

प्रकरणाची पार्श्वभूमी:

४ जुलै रोजी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती, त्यानंतर ती बेपत्ता झाली.

रविवारी सूर्यपूर हाट परिसरातील एका तलावात तिचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर जखमा होत्या.

शवविच्छेदनातून असे स्पष्ट झाले की, बलात्कार करून तिला जिवंतपणी तलावात फेकले गेले होते, ज्यामुळे बुडून आणि अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता अडवून निदर्शने केली होती. संतप्त जमावाने या गुन्ह्यातील संशयित इंद्रजित मंडल यालाही मारहाण करून ठार केले होते.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण तिघांना अटक झाली असून, तपास करण्यासाठी सहा सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *