पुणे: मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे स्वतंत्र ऑडिट करा; सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे: द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) प्रकल्पाच्या कामावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका करत प्रकल्पाचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष कामात स्पष्ट विसंगती (मिसमॅच) दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांवर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. प्रकल्पाच्या नियोजनात, सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या आहेत का, याची सखोल चौकशी करून संपूर्ण कामाचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिक निधीचा वापर पारदर्शक पद्धतीने झाला आहे का, कामाची गुणवत्ता अपेक्षेनुसार आहे का आणि नैसर्गिक आपत्तींचा विचार करून प्रकल्पाची रचना करण्यात आली होती का, असे प्रश्न उपस्थित केले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणत्याही प्रकल्पात तडजोड होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या मागणीमुळे कनेक्टिंग लिंक प्रकल्प पुन्हा चर्चेत आला असून, प्रकल्पाच्या कामकाजाबाबत आणि खर्चाबाबत सविस्तर पडताळणी करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *