निवडणुकांना एक किंमत असते आणि ती म्हणजेभ्रष्टाचार. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूकलढवण्यासाठी पक्षांना दोन प्रमुख आवश्यकता असतात.पहिली, आपल्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठीमोठ्या प्रमाणावर निधी गोळा करणे. दुसरी, आपल्याजागा वाढवण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पक्षातघेणे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या मते,2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पाच राष्ट्रीयआणि 21 प्रादेशिक राजकीय पक्षांना देणगीदारांकडूनअधिकृतपणे एकूण 7,445 कोटी रुपये मिळाले होते. हानिवडणूक निधीचा वैध भाग आहे. व्यावसायिक कंपन्या आणि व्यक्तींना पक्षांना देणगीदेण्याची परवानगी देणारी वादग्रस्त इलेक्टोरल बाँडयोजना फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रद्दकेली होती. परंतु बहुतांश पक्षांनी याचे पर्याय शोधण्याचेमार्ग विकसित केले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतरही अंतर्गतरीत्या विभाजित तृणमूलकाँग्रेसच्या बँक खात्यात 630 कोटींहून अधिक रक्कम शिल्लक असणे हे दर्शवते की, निवडणूक प्रक्रियेदरम्यानवैध आणि अवैध, अशा दोन्ही प्रकारच्या धनाचा व्यापक प्रवाह असतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत7,445 कोटींचा अधिकृत खर्च हा प्रत्यक्ष निवडणूक खर्चाचा केवळ एक छोटा भाग आहे. सेंटर फॉर मीडिया स्टडीजने असा अंदाज व्यक्त केला आहे की,निवडणुकीचा एकूण खर्च 1.35 लाख कोटी रुपये होता.हा 2004 च्या लोकसभा निवडणुकीत खर्च झालेल्या15,000 कोटींच्या तुलनेत 900 टक्के अधिक आहे. हा2020 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर झालेल्या1.2 लाख कोटी रुपयांच्या खर्चापेक्षाही जास्त आहे.निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादाठरवली आहे. प्रत्येक खासदार कायदेशीररीत्या जास्तीतजास्त 95 लाखांपर्यंत खर्च करू शकतो, तरआमदारांसाठी ही मर्यादा 28 लाख ते 40 लाखांच्यादरम्यान आहे. परंतु पक्षांच्या निवडणूक खर्चावर मर्यादानाही. या अंदाजांच्या आधारे, 2024 च्या लोकसभानिवडणुकीत अवैध निधी 1 लाख कोटी रुपयांपेक्षाअधिक होता. हा पैसा कंपन्या, रिअल इस्टेट डेव्हलपर्सआणि इतर स्रोतांकडून आला. हे ज्या पक्षांना पैसा देतात,त्यांच्याकडून भविष्यात लाभाची अपेक्षाही ठेवतात. ही प्रवृत्ती केवळ भारतापुरती मर्यादित नाही.उदाहरणार्थ, अमेरिकेत नियमित पब्लिक अफेअर्सकमिट्या सिनेटर आणि प्रतिनिधी सभेच्या उमेदवारांच्यानिवडणूक मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा लावतात.अमेरिकन इस्रायल पब्लिक अफेअर्स कमिटीसारखेप्रभावशाली फंडिंग ग्रुप्स एखाद्या उमेदवाराच्यानिवडणूक शक्यता बनवू किंवा बिघडवू शकतात. हीकमिटी दशकांपासून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्योबायडेन आणि सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांसारख्या नेत्यांनाआर्थिक पाठबळ देत आली आहे. अंतर केवळपारदर्शकतेचे आहे. भारतात निवडणुकांमध्ये रोख निधीचेप्रमाण अधिक आहे आणि ते व्यापक भ्रष्टाचारालाखतपाणी घालते. केंद्र स्तरावर भ्रष्टाचार यूपीएच्याफोन-बँकिंगच्या काळाच्या तुलनेत कमी झाला असला,तरी राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरभ्रष्टाचार वाढला आहे. सरकार यापासून अनभिज्ञ नाही,परंतु त्याबाबत फार काही करू शकत नाही. प्रत्येकस्तरावर निवडणूक निधीची गरज असते. विधानसभाआणि महापालिकांमध्ये बहुमत मिळवण्यासाठी विरोधीनेत्यांना आपल्या पक्षात घेणे मोठी किंमत मोजायलालावते. परंतु या सर्वांमुळे मतदारांच्या दोन प्रमुखवर्गांमध्ये असंतोष वाढत आहे. पहिला, मध्यमवर्गीयकरदाते आणि व्यापारी, ज्यांना वाटते की त्यांच्यासोबतअपेक्षित न्याय झालेला नाही. दुसरा, जेन-झी तरुण,ज्यांचे मानणे आहे की सरकारने रोजगार निर्मितीसाठीखूप कमी प्रयत्न केले आहेत. हे दोन्ही वर्ग प्रामुख्यानेसोशल मीडिया आणि ऑनलाइन माध्यमांवरच अधिकसक्रिय आहेत. बहुतांश भारतीय या वाढत्याअसंतोषापासून अप्रभावित आहेत. परंतु सरकार त्यांनाकमी लेखू शकत नाही. राम मंदिराच्या दानपेटी चोरीचीघटना एक इशारा आहे. भारतीय जनता पक्ष राममंदिराच्या मुद्द्यावर सत्तेपर्यंत पोहोचला होता.भ्रष्टाचाराचा डाग देवाच्या घरापर्यंत पोहोचताना दिसला,तर भाजपच्या किल्ल्याचा पाया कमकुवत होऊ शकतो.पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीही अनेक संकटांचा सामनाकेला आहे - कोविड, टॅरिफ, युद्ध इ. परंतु भ्रष्टाचारअनेक शिर असलेल्या राक्षसासारखा आहे. 2029 च्यालोकसभा निवडणुकीपूर्वी त्यावर नियंत्रण मिळवणेमोदींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) प्रत्येक स्तरावर निवडणूक निधीची गरजअसते. या सर्वांमुळे मतदारांच्या दोनप्रमुख वर्गांमध्ये असंतोष वाढत आहे.पहिला, मध्यमवर्गीय करदाते आणिव्यापारी. आणि दुसरे, जेन-झी तरुण.सरकार त्यांना कमी लेखू शकत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




