मेरठ: मेरठच्या सरूरपूर भागात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर आपल्या रील्समुळे प्रसिद्ध असलेल्या निशा चौहान (४५) यांची त्यांच्याच पतीने चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. या भयानक हल्ल्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारा त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे.
नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, निशा चौहान आणि त्यांचे पती प्रदीप यांच्यात हर्रा शहरातील जमिनीच्या एका भूखंडाच्या नोंदणीवरून वाद सुरू होता. गुरुवारपासून हा वाद विकोपाला गेला होता की, मालमत्ता कोणाच्या नावावर करावी, यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शुक्रवारी सकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि प्रदीपने रागाच्या भरात धारदार चाकूने निशा यांच्यावर हल्ला केला.
मुलासमोरच आईची हत्या निशा या सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होत्या आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे हजारो फॉलोअर्स होते. तसेच, त्या शहरात स्वतःचे ब्युटी पार्लरही चालवत होत्या. घटनेच्या वेळी निशा यांचा मुलगा घरीच होता. आईवर हल्ला होताना पाहून त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु नराधम बापाने त्याच्यावरही वार केले. आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून मुलगा जोरात ओरडू लागला, ज्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावून आले. मात्र, तोपर्यंत निशा यांचा मृत्यू झाला होता.
आरोपीची आत्महत्येचा प्रयत्न पत्नीची हत्या केल्यानंतर प्रदीपने स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा प्रदीप रक्ताने माखलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी प्रदीपला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिस तपास सुरू सरधनाचे पोलीस अधीक्षक आशुतोष कुमार आणि स्टेशन हाऊस ऑफिसर गौरव सिंग यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून फॉरेन्सिक टीमद्वारे पुरावे गोळा केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात मालमत्तेचा वाद हेच हत्येचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस अधिक कायदेशीर कारवाई करत आहेत.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




