सोलापूर:शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. वाहतूक शाखेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी पोलिस उपायुक्त (वाहतूक) वृष्टी जैन यांनी ट्रॅफिक पोलिसांना ड्युटीदरम्यान नेमून दिलेल्या ठिकाणीच उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. याचबरोबर HSRP(High Security Registration Plate) नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) कठोर कारवाई करण्यात येणार असून रिक्षाचालकांसाठी ड्रेसकोडही सक्तीचा करण्यात आला आहे.
१८ ब्लॅकस्पॉटवर विशेष लक्ष सोलापूर शहरात अपघातप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १८ ब्लॅकस्पॉटची ओळख पटविण्यात आली आहे. या ठिकाणी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत अपघात अधिक होतात, त्यामागील कारणांचा सखोल अभ्यास सुरू आहे. या अभ्यासाच्या आधारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने वाहतूक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे, जेणेकरून अपघातांचे प्रमाण आणखी कमी करता येईल.
अपघातांमध्ये घट
मागील वर्षी जून महिन्यात नऊ गंभीर अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यावर्षी जून महिन्यात गंभीर अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येत चारने घट झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त वृष्टी जैन यांनी दिली.यापुढे बेशिस्त वाहनचालकांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी शहरात स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांबाबत जनजागृती
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी पोलिस विभाग जनजागृती मोहीमही राबविणार आहे.पोलिस विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून, सर्वसामान्य दुचाकीस्वारांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
HSRP नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर RTO ची कारवाई
वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी HSRP (High Security Registration Plate) नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाणार आहे.
वाहनमालकांनी नियमानुसार HSRP नंबरप्लेट बसवून घ्यावी, अन्यथा तपासणीदरम्यान दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
रिक्षाचालकांसाठी ड्रेसकोड अनिवार्य
सोलापूर शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक रिक्षाचालकाने निर्धारित गणवेश परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय शहरातील काही रिक्षा स्टँडवर जागेची कमतरता असल्याने त्या ठिकाणी जागा वाढवून देण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही पोलिस उपायुक्तांनी दिली.
प्रशासनाचा उद्देश
वाहतूक कोंडी कमी करणे, अपघातांचे प्रमाण घटविणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ करणे हा या उपाययोजनांचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




