पुणे: हडपसरमध्ये थरार! १७ वर्षीय टेम्पोचालकाची हुलकावणी, ३-४ गाड्यांना धडक दिल्यानंतर जमावाचा संताप

पुणे: हडपसर भागात एका १७ वर्षीय टेम्पोचालकाने पोलिसांच्या कारवाईला न जुमानता टेम्पो भरधाव चालवून थरार निर्माण केला. टिंटेड ग्लास आणि फॅन्सी नंबर प्लेटविरोधात पोलीस विशेष कारवाई करत होते. यावेळी वानवडी विभागाकडून
संबंधित टेम्पो न थांबवता पळवून नेल्याचा संदेश मिळाल्यानंतर, वैदूवाडी परिसरात पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून टेम्पो पुढे दामटला.

या घटनेची दखल घेत शिवसैनिक दत्ता खवले, अमित सपकाळ, सतीश माने आणि सोमनाथ माने यांनी रविदर्शनपासून १५ नंबर चौकापर्यंत टेम्पोचा पाठलाग केला. १५ नंबर चौकात टेम्पोच्या पुढे टँकर उभा करून शिवसैनिकांनी चालकाला पकडले आणि
पोलिसांच्या ताब्यात दिले. या थरार प्रवासादरम्यान टेम्पोने ३ ते ४ वाहनांना धडक देऊन त्यांचे किरकोळ नुकसान केले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहतूक शाखा आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप
करून चालकाला सुरक्षितपणे हडपसर पोलीस ठाण्यात नेले.

 

चालकाचे नाव सोहन प्रमोद देवकाते (वय १७, रा. चौफुला, केडगाव, पुणे) असे आहे. हडपसर पोलिसांनी चालक आणि वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी वानवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. चालक अल्पवयीन असल्याने बीएनएस (BNS)
कलम ११० अन्वये वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *