आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामनेरंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचूशकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितचनिराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतीलभारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावेलागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरीकेली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांतयाची मोठी किंमत मोजावी लागली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्टखेळी केली.भारताला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र,इतर सामन्यांत ती गरजेपेक्षा अधिक सावध दिसली.दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशीच खेळी झाली असती,तर भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. हीच सातत्याची कमतरता संघाला महागात पडली. स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिका आणिऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण मोठीखेळी करण्यात अपयश आले. हे दोन्ही सामने निर्णायक होते. अशा वेळी संघातील प्रमुख फलंदाज अपेक्षितयोगदान देऊ शकला नाही, ही चिंतेची बाब ठरली.जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांचा संपूर्णस्पर्धेतील खेळ निराशाजनक राहिला. जेमिमानेस्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करण्याची गरजआहे. तिच्याकडे गुणवत्ता असली तरी ती सातत्यानेमोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे. 2025 च्याविश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्याशतकानंतर तिने अपेक्षित सातत्य राखलेले नाही. दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. मात्रत्यानंतर विशेष प्रभाव पाडता आला नाही.ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356 वाबळी मिळवूनही त्यांचा विश्वचषक समाधानकारकठरला नाही. ऋचा घोषनेही एका चांगल्या सामन्यानंतरसातत्य राखले नाही. गोलंदाजीत चारणी वगळता इतरकोणीही निर्णायक क्षणी पुढे आले नाही. क्षेत्ररक्षणहीसंपूर्ण स्पर्धेत सरासरीपेक्षा कमी दर्जाचे राहिले. उत्कृष्टक्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या राधा यादवकडूनहीमहत्त्वाचे झेल सुटले. आता पुढचा मार्ग कोणता, हामोठा प्रश्न आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतसुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असेल. मात्र खरे आव्हानफेब्रुवारी 2027 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहे. मुख्यप्रशिक्षक अमोल मजूमदार टी-20 क्रिकेटच्यागरजेनुसार संघात कठोर निर्णय घेण्यास तयार आहेतका, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 आणि 2026या दोन्ही विश्वचषकांत गट टप्प्यातच बाहेर पडणेभारतीय संघासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. दोनवर्षांनंतरच्या ऑलिम्पिकचा विचार करता संघाला नव्याकल्पना आणि नव्या दृष्टिकोनाची गरज आहे. अमोलमजूमदार यांच्यासाठी पुढील काही महिने अत्यंतमहत्त्वाचे असतील. दुखापतींचा फटका संघाला बसलाअसला, तरी सक्षम राखीव खेळाडू तयार ठेवणे आणिनव्या खेळाडूंना संधी देणे ही प्रशिक्षकांची जबाबदारीअसते. प्रतिभा आणि संसाधनांची कमतरता नसतानाभारताकडून अपेक्षाही मोठ्या असणार आहेत.रणनीतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाला ‘रिटायर्ड आऊट'' का केलेनाही? ऋचा घोषला वरच्या क्रमांकावर का पाठवलेनाही? तिसऱ्या क्रमांकावर सतत बदल का करण्यातआले? डावखुरा-उजव्या हाताचा फलंदाज हा एकमेवनिकष असू शकत नाही. तिसरा क्रमांक हा विशेषजबाबदारीचा असून त्या स्थानासाठी खेळाडूलासातत्याने संधी देणे आवश्यक असते. तसेच, गोलंदाजप्रेमा रावतला दोन षटकांनंतर पुन्हा गोलंदाजी का देण्यातआली नाही, याचाही उलगडा व्हायला हवा. या प्रश्नांसह भारताचा विश्वचषकातील प्रवास संपलाआहे. आता केवळ आत्मपरीक्षण नव्हे तर या प्रश्नांचीठोस उत्तरे शोधून त्यानुसार बदल अमलात आणण्याचीवेळ आली आहे. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) आता भारतीय महिला संघाचे पुढीललक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा असेल.आशियाई स्तरावर फारशी कडवी स्पर्धानसल्याने भारताला सुवर्णपदकजिंकण्याची चांगली संधी आहे. खरे लक्षफेब्रुवारी 2027 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्यामहिला चॅम्पियन्स ट्रॉफीकडे असायलाहवे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
महाराष्ट्र
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
गुन्हा
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपुरात शेतीपंप बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
देश विदेश
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.
- उल्हासनगर महापालिकेची उधळपट्टी! अवघ्या ३ तासांच्या महिला दिन कार्यक्रमावर २२ लाखांचा खर्च; ५० फेट्यांसाठी ७५ हजार अन् जेवणावर १० लाख!






















Subscribe to my channel



