8 Members of Pandharpur Family Perish as Pickup Falls into Well During Pilgrimage

पंढरपूर: बावचे कुटुंबावर काळाचा घाला; कुलदैवताच्या दर्शनावरून परतताना पिकअप विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

8 Members of Pandharpur Family Perish as Pickup Falls into Well During Pilgrimageपंढरपूर: आपल्या सहा महिन्यांच्या आजारी बाळाच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पंढरपूरच्या बावचे कुटुंबावर अमावास्येच्या दिवशीच काळाने घाला घातला आहे. म्हसवड (सातारा) येथून दर्शन घेऊन परतत असताना त्यांचे पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात बावचे कुटुंबातील सहा जणांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना:
पंढरपुरातील अनिल नगर येथील बावचे कुटुंब आपल्या सहा महिन्यांच्या आजारी बाळाच्या आरोग्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध देवस्थानांच्या दर्शनाला जात होते. अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आणि अमावास्येचे औचित्य साधून त्यांनी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी देवीच्या दर्शनाचा बेत आखला होता. दर्शन घेऊन परतत असताना भाळवणी-पंढरपूर दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने झालेल्या या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

 

अशी घडली मदत:
अपघात इतका भीषण होता की, विहिरीत पडलेल्या पिकअपमधून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शीनी पिकअपवरील ताडपत्री अडकित्त्याने फाडून बचावकार्य केले. दुर्दैवाने या अपघातात ८ जणांचा जीव गेला. या अपघातात बावचे कुटुंबातील संदीप आणि बालाजी हे दोन भाऊ आणि त्यांची दोन छोटी मुले (जिया आणि आरव) चमत्कारिकरीत्या वाचले आहेत.

रुग्णालयातील वातावरण:
अपघाताची बातमी पंढरपुरात पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून, मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला घरं पाडणारा आहे. या घटनेने पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



महाराष्ट्र

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *