बीड: केज तालुक्यात डोंगरात दुर्गम ठिकाणी असलेल्या गौरवाडी वस्तीत घराजवळ खेळतांना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सुप्रिया बबरू घाडगे (वय १२ रा. गौरवाडी) या मुलीस सर्पदंश झाला. वाडीला रस्ता नसल्याने दुचाकीवरून रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने वाटेत तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता घडली.
गौरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौरवाडी येथील सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारी सुप्रिया घाडगे ही मंगळवारी शाळा सुटल्यानंतर गौरवाडी वस्तीवरील तिच्या घराबाहेरील परिसरात खेळत असताना सापाने तिला दंश केला. याची माहिती मिळताच तिचे काका आणि भावाने तिला दुचाकीवर बसवून मंगळवारी रात्री थेट नेकनूर येथील कुटीर रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉ. अशोक हुबेकर यांनी तपासणी करून रात्री आठ वाजता तिला मृत घोषित केले.
गौरवाडीपर्यंत रस्ताच नाही, केवळ पाऊलवाट
केज तालुक्यातील गौरवाडी वस्ती ही दुर्गम भागात असुन या वाडीपर्यंत पाऊल वाटेचा रस्ता आहे, केवळ दुचाकी येते. गावातही वाहनाची कुठलीच सोय नाही. केवळ गावातील रस्ता चांगला नसल्याने कुटुंबीयांना सुप्रियाला वेळेत रुग्णालयात नेता आले नाही. गावापर्यंत चारचाकी वाहन येत नसल्याने ग्रामस्थांनी १०८ क्रमांकही डायल केला नाही.
वडीलांचा दोन वर्षापूर्वीच अपघाती मृत्यू
सुप्रियाचे वडील बबरू घाडगे यांचा दोन वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला असून तिची आई ऊसतोडणी करून पाच मुली आणि एका मुलाचा सांभाळ करीत आहे. आई साखर कारखान्यावर ऊसतोडणीला जाण्याच्या तयारीत असतानाच सुप्रीयाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लस होती
आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० रूग्णांना पुरेल एवढी सर्पदंशाची लस उपलब्ध होती. आमच्याकडे सदरील रुग्ण आला नाही. आमच्याकडे गंभीर रुग्ण आला तर लस देऊन आम्ही बीडला अतीदक्षता विभागात पाठवतो
- अभिषेक थोरात, वैद्यकीय अधिकारी, विडा
शहर
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
महाराष्ट्र
- राजगड: गोळीबाराने खळबळ! ४७ वर्षीय व्यक्तीवर झाडली गोळी; आरोपीला पोलिसांकडून अवघ्या ८ तासांत अटक!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




