PM Kisan Alert: Complete E-KYC Before June 30 or Miss Out on Your ₹2,000 Installment!

पीएम किसान योजना: शेतकऱ्यांनो सावधान! ३० जूनपूर्वी 'हे' काम न केल्यास हक्काचे २००० रुपये बुडणार!

 PM Kisan Alert: Complete E-KYC Before June 30 or Miss Out on Your ₹2,000 Installment!नवी दिल्ली: केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. आता या योजनेचा २३ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी एक अत्यंत महत्त्वाचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.

 

काय आहे महत्त्वाची प्रक्रिया?
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली 'ई-केवायसी' (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची वार्षिक पडताळणी (Verification) केली जाणार आहे. यासाठी १ जून ते ३० जून ही मुदत निश्चित करण्यात आली आहे.

मुदतीनंतर काय होईल?
कृषी विभागाच्या सूचनेनुसार, ज्या शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना पुढील म्हणजेच २३ व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही. हे २,००० रुपये मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी विनाविलंब ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रक्रिया कशी पूर्ण करावी?
शेतकरी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. सरकारकडून या प्रक्रियेसाठी वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जर तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केले नाही, तर तुमच्या खात्यात जमा होणारे २,००० रुपये अडकू शकतात, त्यामुळे सतर्क राहून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करा.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये  https://punenews24.in/



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *